घरमनोरंजनराखी सावंतचं कपूर हॉस्पिटलमध्ये होणार मेडिकल चेकअप

राखी सावंतचं कपूर हॉस्पिटलमध्ये होणार मेडिकल चेकअप

Subscribe

ड्रामा क्वीन राखी सावंत मागील अनेक दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राखीच्या आईचे निधन झाले. त्या दुःखातून बाहेर पडेपर्यंत राखीच्या आयुष्यात पुन्हा एक दुःखाचा डोंगर कोसळला. राखीचा पती आदिल खान दुर्रानीचे विवाहबाह्य संबंध आणि कौटुंबिक हिंसाचार, मारहानीचे आरोप करत आदिलवर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देखील केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक देखील केली. दरम्यान आता राखीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात तिचे मेडिकल चेकअप होणार असल्याचं सांगत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या व्हिडीओमध्ये राखी सांगतेय की, तिचं कपूर हॉस्पिटलमध्ये मेडिकल चेकअप होणार आहे. तिच्या शरीरावर जिथे जिथे जखमेचे डाग आहेत आणि आदिलने तिला कसं टॉर्चर केलं आणि किती त्रास दिला हे सर्व ती डॉक्टरांना सांगितलं. या व्हिडीओ आधी आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यात काही लोक तिला शुभेच्छा देत तुम्हाला न्याय मिळाला असं म्हणत आहेत. त्यावर राखी म्हणते न्यान नाही मिळाला आदिलच्या पहिल्या लग्नाचं कार्ट आणि घटस्फोटाचे पेपर मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून राखीच्या लग्नाबाबत चर्चा सुरु आहेत. प्रत्येक दिवशी एक नवीन बातमी समोर आहे. बिग बॉस मराठीतून बाहेर आल्यावर राखीने तिच्या आणि आदिलच्या लग्नाचा खुलासा केला होता यावेळी आदिलच्या घरचे त्यांच्या लग्नासाठी तयार नाहीत आणि आदिलचे विवाहबाह्य संबंध असल्याचं देखील म्हणाली होती.

 

- Advertisement -

हेही वाचा :

15 व्या दिवशी देखील ‘पठाण’चा जलवा कायम; जमावला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -