घरमहाराष्ट्र...तर मी आमदारकीचा राजीनामा देईन; हसन मुश्रीफ आक्रमक

…तर मी आमदारकीचा राजीनामा देईन; हसन मुश्रीफ आक्रमक

Subscribe

मुश्रीफ यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यासंदर्भातील गैरव्यवहारांचे आरोप केले होते.

पश्चिम महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजाचे नेते आणि शरद पवार यांचे निष्ठावंत असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज ईडीने धाड टाकल्यामुळे एकच खळबळ उडाली. नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात ईडीने कारवाई केली आहे. मुश्रीफ यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यासंदर्भातील गैरव्यवहारांचे आरोप केले होते. त्यांच्यावरील आरोपांवर आता हसन मुश्रीफ यांनी आव्हान दिलंय.

हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्य़ातील घरांवर ईडीने ११ जानेवारी २०२३ रोजी छापे मारले होते. मात्र त्यामध्ये काहीच सापडले नाही. कारखान्यातील ९८ टक्के पैसा हा मनी लाँडरींगच्या माध्यमातून जमवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घोटाळ्यात मुश्रीफांचे जावई मतीन मंगोली यांचाही सहभाग असल्याचं सांगण्यात येत आहे. हा कारखाना काही वर्षांपूर्वी ब्रिस्क इंडिया कंपनीला विकण्यात आला होता. ब्रिस्क इंडिया ही कंपनी जावई मंगोलींच्या मालकीची आहे. व्यवहारासाठी कोलकाता येथील बंद पडलेल्या कंपन्यांच्या नावाने बोगस खाती तयार केली आहेत. या बोगस खात्यांमध्ये टाकलेले पैसे ब्रिस्क इंडिया कंपनीत वळवल्याचा आरोप करण्यात आला होता.

- Advertisement -

भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपानंतर हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीची छापेमारी सुरू झाली असून यावर आता हसन मुश्रीफ यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, “सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यासाठी मी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून कोणतेही कर्ज घेतलेले नाही.काही गैरसमज असतील तर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी समोरासमोर बसून माहिती घ्यावी” असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे. “हे निव्वळ माझ्या बदनामीचे षडयंत्र आहे” असा आरोपही हसन मुश्रीफ यांनी केलाय.

पाहा काय म्हणाले हसन मुश्रीफ ?

- Advertisement -

“माझ्या केलेल्या सर्व आरोपांपैकी एक जरी आरोप खरा ठरला तर मी आमदारकीचा राजीनामा देईन.” असं आव्हानंच यावेळी हसन मुश्रीफ यांनी दिलंय. ट्विटर एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी हे आव्हान दिलंय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -