घरमहाराष्ट्रसीबीएसईच्या 10वी आणि 12वीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून, 38 लाखांहून अधिक विद्यार्थी

सीबीएसईच्या 10वी आणि 12वीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून, 38 लाखांहून अधिक विद्यार्थी

Subscribe

मुंबई : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या (सीबीएसई) इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा उद्या, 15 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार आहेत. इयत्ता 10वीची परीक्षा 21 मार्च 2023 रोजी संपणार असून, 12वीची परीक्षा 5 एप्रिल 2023 रोजी संपणार आहे. सीबीएसईने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान पाळण्याची मार्गदर्शक तत्त्वे देखील आधीच जारी केली होती.

यंदा 38 लाख 83 हजार 710 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. त्यापैकी 21 लाख 86 हजार 940 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार असून त्यात एकूण 12 लाख 47 हजार 364 मुले आणि 9 लाख 38 हजार 566 मुली बसतील. तर, 16 लाख 96 हजार 770 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार असून त्यात 9 लाख 51 हजार 332 मुले आणि 7 लाख 45 हजार 433 मुली परीक्षा देणार आहेत. सीबीएसईने देशात आणि परदेशात 7 हजार 250 हून अधिक परीक्षा केंद्रे स्थापन केली आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 7240 केंद्रे आणि बारावीच्या परीक्षेसाठी 6759 केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

एसएससी बोर्डाच्या 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारीला
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीत तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता 10वीची परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

दहावी आणि बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत जनजागृती मोहीम तर राबविण्यात येईलच; पण पोलिसांची मदत देखील घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या 50 मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार नाही. अतिसंवेदनशील, संवेदनशील, सर्वसाधारण असे परीक्षा केंद्रांचे वर्गीकरण करण्यात येणार असून कलम 144 म्हणजेच जमावबंदीच्या अंतर्गत प्रतिबंधकात्मक आदेश देण्यात येतील. तसेच परीक्षा केंद्रांच्या 50 मीटरच्या आतील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

हेही वाचा – प्रसारमाध्यमांच्या कार्यालयांवरती धाड टाकणं हे कोणत्या लोकशाहीत बसतं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -