घरमहाराष्ट्रअमित शाहांच्या ताफ्यात घुसली अज्ञात कार, पुण्यातील दौऱ्यातील प्रकार

अमित शाहांच्या ताफ्यात घुसली अज्ञात कार, पुण्यातील दौऱ्यातील प्रकार

Subscribe

पुणे – केंद्रीय गृहमंत्री कालपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामळे त्यांनी ठिकठिकाणी भेटी देण्यास सुरुवात केली आहे. काल ते पुण्यात गेले असता त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आढळल्या असल्यची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याप्रकऱणी एका संशियाताला ताब्यात घेण्यात आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे १८ फेब्रुवारी रोजी पुण्यात आगमन झाले. सायंकाळी त्यांनी सेनापती बापट मार्गावरील एका तारांकित हॉटेलमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांशी संवाद साधला. या कार्यक्रमात दाखल होण्यापूर्वी शाहा यांच्या ताफ्यात एकाने मोटार घुसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, केंद्रीय गुप्तचर यंत्रणेला माहिती मिळताच त्यांनी सोमेश धुमाळ या संशयिताला ताब्यात घेतले.

- Advertisement -

आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खादार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्ती असल्याचा बनाव रचन समोमेश धुमाळ याने ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न केला होता.परंतु, केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडे ताफ्यातील गाड्यांचे क्रमांकाची लिस्ट होती. या लिस्टमध्ये यागाीचा क्रमांक आढळला नाही. यावरून पोलिसांनी संशियत आरोपी सोमेश धुमाळ याच्यासह गाडीही ताब्यात घेतली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -