घरमहाराष्ट्र"तू तुझी सुरूवात राज नावाने कर", बाळासाहेब ठाकरेंनी केलेली 'ती' सूचना राज...

“तू तुझी सुरूवात राज नावाने कर”, बाळासाहेब ठाकरेंनी केलेली ‘ती’ सूचना राज ठाकरेंच्या आठवणीत

Subscribe

यावेळी राज ठाकरे म्हणाले, "मी माझं पहिलं भाषण केलं होतं, त्यावेळी मॉं आल्या होत्या...."

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला द्यायचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. त्यातच २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपली. उद्धव ठाकरे यांची पक्षही गेला, चिन्हही गेले आणि पक्षप्रमुख पदही गेले अशी परिस्थिती आहे. अशात आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली एक सूचना सांगितली आहे. बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगत असताना राज ठाकरेंनी त्यांच्या नावा मागचं रहस्य देखील उघड केलंय.

मनसे प्रमुख राज ठाकरे हे मुंबईतील व्हिजेटीआय कॉलेजमधील रंगवर्धन सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनी कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी दिलखुलासपणे संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला. याविषयी बोलताना राज ठाकरे

- Advertisement -

“मी माझं पहिलं भाषण केलं होतं, त्यावेळी मॉं आल्या होत्या. ही गोष्ट १९९१ ची आहे. मॉं मला त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंकडे घेऊन गेल्या. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या वडिलांनी दिलेला एक मंत्र मला सांगितला. जे मैदान असेल त्या मैदानाची भाषा बोल, कसं बोललात हे महत्त्वाचं नाही, समोरच्या काय विचार करायला दिला हे विचार कर”, असं राज ठाकरे म्हणाले.

यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या नावामागचं रहस्य देखील उलगडलं. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “माझे वडील संगीतकार होते. मी संगीत क्षेत्रात काहीतरी करावं अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्यांनी माझं नाव स्वरराज ठेवलं होतं. पण कालांतराने माझा राग त्यांना कळला. याला राग कुठे येतो, कुठे जमतो. मी जेव्हा व्यंगचित्र करायचो तेव्हा स्वरराज ठाकरे नावाने करत असे. पण एकेदिवशी बाळासाहेब ठाकरेंनी मला बोलवलं आणि म्हणाले, “मी माझ्या करीअरची सुरूवात बाळ ठाकरे नावाने केलीय, तर आजपासून तू तुझी सुरूवात राज ठाकरेंनी करायची. तेव्हापासून माझं नाव राज ठाकरे झालं.”

- Advertisement -

या कार्यक्रमात कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंना यांना त्यांच्या मनातील काही प्रश्न उपस्थित केले. यावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर भाष्य केलं. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “इंच इंच विकू, जे दिसेल ते विकायचं आणि त्यातून पैसे कमवायचं, हे उद्योग सध्या सुरू आहेत. सरकारच्या गोष्टी सरकारकडून काढायच्या आणि खाजगी लोकांच्या घशात घालायच्या हा प्रकार सुरू आहे. जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना केवळ मतं हवी आहेत, त्यांचं कल्याण करू नका. या जातीपातीमुळे देशात विचका झालाय. ज्या महाराष्ट्राने देशाला विचार दिला, तो महाराष्ट्रात या जाती पातीच्या खितपत पडता कामा नये”

यापुढे बोलताना राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्या असं आवाहन देखील केलंय. याविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, हार घालण्यापुरतं छत्रपती शिवाज महाराजांचा विषय ठेऊ नका, छत्रपती शिवाज महाराज नीट समजून घेतले पाहिजेत. मी शिववेडेपणाचा कधी आव नाही आणत. मी त्यातून बोध घेतो. आपण कोण आहोत, आपला वारसा काय, या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतरही औरंगजेब २७ वर्षे महाराष्ट्रात होता, औरंगजेबची जी पत्र गेली आहेत, त्यात त्याने शिवाजी अजून मला छळतोय असा उल्लेख केलेला आहे. संभाजी राजे, राजाराम महाराज, संताजी धनाजी यांची जी प्रेरणा होती, यांच्यामधील शिवाजी महाराज यांचा विचार औरंगजेबला मारायचा होता, त्यांची जी प्रेरणा होती त्यांना तो शिवाजी म्हणत होता.”

“सव्वाशे वर्ष या हिंदप्रांतावर मराठेशाहीने राज्य केलंय. यानंतर मोघल, ब्रिटीश, पोर्तुगीज आले, पण या हिंदप्रांतावर फक्त मराठेशाहीने राज्य केलंय.” असं देखील राज ठाकरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -