घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रSpecial Report : सायकलऐवजी ट्रॅकवर मद्यपी अन् प्रेमीयुगुलांची सफर; इंदिरानगर सायकल ट्रॅकची...

Special Report : सायकलऐवजी ट्रॅकवर मद्यपी अन् प्रेमीयुगुलांची सफर; इंदिरानगर सायकल ट्रॅकची दूरवस्था

Subscribe

दिलीपराज सोनार । इंदिरानगर

इंदिरानगर परिसरातील वडाळागांव चौफुली ते साईनाथ चौक चौफुली यादरम्यान बनविण्यात आलेला सायकल ट्रॅक महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणा आणि दुर्लक्षामुळे मोडकळीस आला आहे. या सायकल ट्रॅकची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

- Advertisement -

सुदृढ आरोग्यासाठी सायकल चालवणे हितकारक असल्याने अनेक नागरिक सायकलिंगला अधिक महत्त्व देतात. दिवसेंदिवस वाढते सायकलिंगचे वाढते महत्त्व लक्षात घेता नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांनी आपल्या आमदार निधीतून लाखो रुपयांचा निधी वापरुन इंदिरानगर परिसरातील वडाळागाव चौफुली ते साईनाथनगर चौफुलीदरम्यान सायकल ट्रॅकची निर्मिती केली. नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे पालिका प्रशासनाने लक्ष घालून सायकल ट्रॅकची देखभाल आणि दुरुस्तीदेखील केली. परंतु, गेल्या वर्षभरापासून पालिकेच्या उदासीनतेमुळे या सायकल ट्रॅकला उतरती कळा लागली आहे. सायकल ट्रॅकमध्ये बसविण्यात आलेली सिमेंटची बाके मोडून पडली आहेत. ट्रॅकवर मद्यपींचा वावर दिसून येतो. ट्रॅकवर प्रेमी युगुलांचाही वावर दिसून येते त्यांच्या अश्लिल चाळ्यांमुळे महिला अक्षरशः खाली मान घालून जावे लागते.

एका सलुन दुकानदाराने तर चक्क सायकल ट्रॅकवरच सलुनचे दुकान थाटले आहे. तर अगदी काहिशा अंतरावर एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍याने राजकीय पक्षाच्या नावाचा वापर आणि दहशत करुन चक्क पक्ष कार्यालयच थाटले आहे. वास्तविक पाहता इंदिरानगर परिसरातील वडाळागाव चौफुली ते साईनाथनगर चौफुलीदरम्यान सायकल ट्रॅक व्हावा अशी सायकलिस्ट आणि सायकल प्रेमींची होती.

- Advertisement -

सायकलिस्ट आणि सायकलप्रेमींची वाढती मागणी लक्षात घेता नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांनी आपल्या आमदार निधीतून लाखो रुपयांची निधी वापरुन सायकल ट्रॅक बनविण्यात आला. मात्र, केवळ महापालिकेच्या संबंधित विभागाकडून होत असलेल्या हलगर्जीपणामुळेच सायकल ट्रॅकची दूरवस्था झाली असुन या सायकल ट्रॅकची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना गटाचे सिडको विभागप्रमुख त्रंबक कोंबडे यांच्यासह सायकलिस्ट संघटना तसेच सायकलप्रेमींनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -