घरताज्या घडामोडीखुशखबर! मार्चमध्ये होणार कोस्टल रोडचे उद्घाटन

खुशखबर! मार्चमध्ये होणार कोस्टल रोडचे उद्घाटन

Subscribe

मुंबईकरांसाठी महत्त्वाकांशी आणि सतत वादात सापडलेला कोस्टर रोड प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. येत्या 1 नोव्हेंबरपासून कोस्टल रोड सुरू होणार असून, 15 मार्चला दोन्ही टनेलचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती मिळते.

मुंबईकरांसाठी महत्त्वाकांशी आणि सतत वादात सापडलेला कोस्टर रोड प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. येत्या 1 नोव्हेंबरपासून कोस्टल रोड सुरू होणार असून, 15 मार्चला दोन्ही टनेलचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती मिळते. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सी लिंक दरम्यान साडेदहा किलोमीटरचा कोस्टल रोड प्रकल्पाचा हा पहिला टप्पा नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे. (mumbai coastal road first phase marine drive to bandra worli sea link to be complete by november 2023)

मिळालेल्या माहितीनुसार, कोस्टल रोड प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच, दक्षिण कोस्टल रोड प्रकल्पाचे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प हा दोन भागात विभागला गेला आहे. दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे हे दोन भाग आहेत. यामध्ये दक्षिण भागाचे काम आधी हाती घेण्यात आलं आहे. या कोस्टल रोडमुळे मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे. मात्र, असे असले तरी, हा प्रकल्प तितकाच खर्चिक आहे. विशेष म्हणजे या रोडमुळे मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

- Advertisement -

मुंबई ते कांदिवली दरम्यान जवळपास 29 किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे. दक्षिण कोस्टल प्रकल्प हा साडेदहा किलोमीटरचा आहे जो मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाओवर पासून सुरू होतो ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंत आहे. दरम्यान, सुरुवातीला मरीन ड्राईव्ह पासून ते प्रियदर्शनी पार्क पर्यंत दोन बोगदे आहेत, जे प्रति दोन किलोमीटरचे म्हणजे एकूण 4 किमीचे दोन बोगदे आहेत. हे बोगदे तीन प्रकारचे आहेत. अच्छादित बोगदे, गोलाकार आणि रॅम असे हे तीन प्रकार आहेत. मावळा या टनेल बोरिंग मशीनच्या साह्याने हे भूमिगत मार्ग तयार करण्यात आले आहेत. संपूर्ण दक्षिण कोस्टल रोड प्रकल्पासाठी 12700 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यातील दोन बोगद्यापैकी एका बोगद्याचं काम पूर्ण झालं असून दुसऱ्या बोगदाचे काम 91 टक्के पूर्ण झालंय.

कोस्टल रोड प्रकल्पामध्ये तीन इंटरचेंज आहेत. पहिला इंटर चेंज एमर्सन गार्डन, दुसरा इंटर चेंज हाजी अली आणि तिसरा इंटरचेंज वरळी येथे आहे. इंटरचेंजच्या दरम्यान पार्किंग व्यवस्था भूमिगत असणार आहे. जिथे 1600 वाहने पार्क केले जातील. संपूर्ण कोस्टल रोड हा आठ पदरी असेल तर बोगद्यातील मार्ग हा सहा पदरी असेल. भराव टाकलेल्या जागेवर सौंदर्यकरण आणि इतर प्रस्तावित छोटे-मोठे प्रकल्प आहेत, ज्यामध्ये गार्डन सायकल ट्रॅक जॉगिंग ट्रॅक तयार केला जाणार आहे.

- Advertisement -

भराव टाकण्यात आलेल्या जागेवर मुंबईतील सागरी किनाऱ्यावरील सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी या ठिकाणी सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, सार्वजनिक उद्याने आणि ओपन थिएटर हे सर्व छोटे मोठे प्रकल्प प्रस्तावित असल्याचे समजते. शिवाय, मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यानचे अंतर जिथे एक तास लागतो तिथे कोस्टल रोड प्रकल्पामुळे 10 मिनिटात हे अंतर पार होणार आहे.

‘असा’ आहे कोस्टल रोड प्रकल्प

  • मुंबई ते कांदिवली 29 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड आहे.
  • दक्षिण कोस्टल रोड हा 10.58 किमी लांबीला असून प्रकल्पाचा 70 टक्के काम पूर्ण झाले.
  • प्रिन्सेस ट्रीप फ्लावर ते वांद्रे वरळी सी लिंक पर्यंत दक्षिण कोस्टल रोड प्रकल्प असेल
  • एकूण प्रकल्पाचा खर्च 12,721 कोटी रुपये आहे.
  • यामध्ये 15.66 किमीचे तीन इंटरचेंज आणि 2.07 किमी चे एकूण दोन बोगद्यांचा समावेश असेल.
  • कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर प्रवासामध्ये 70 टक्के वेळेची बचत आणि 34 टक्के इंधन बचत होईल.
  • ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण कमी होईल.

हेही वाचा – MPSC कडून पाच विभागांसाठी 678 जागांसाठी भरती, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -