घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

आइकें सखेदु बोले श्रीकृष्णातें । आतां नाळवावें तुम्हीं मातें । मी सर्वथा न झुंजें एथें । भरंवसेनी ॥
अर्जुन खेदयुक्त अंतःकरणाने म्हणतो,‘देवा, ऐका. आपण मला युद्ध करण्याविषयी कोणत्याही प्रकारे भीड घालू नका. यांच्याशी मी निसंशय युद्ध करणार नाही.’
ऐसें येकि हेळां बोलिला । मग मौन धरूनि ठेला । तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला । देखोनि तयातें ॥
याप्रमाणे एकदम बोलून पुढे काही न बोलता तो स्तब्ध राहिला. अशा स्थितीत त्याला पाहून भगवंतास मोठे आश्चर्य वाटले.
मग आपुलां चित्तीं म्हणे । एथ हें कायी आदरिलें येणें । अर्जुन सर्वथा कांहीं नेणें । काय कीजे ॥
भगवान आपल्या मनात म्हणतात :- याप्रसंगी अर्जुनाच्या मनाने हे काय घेतले आहे कोण जाणे ! अर्जुनाला काहीच कळत नाही याला काय करावे!
हा उमजे आतां कवणेपरी । कैसेनि धीरू स्वीकारी । जैसा ग्रहातें पंचाक्षरी । अनुमानी कां ॥
याची कोणत्या उपायाने समजूत पटेल! काय केले असता हा धीर धरील! ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक पिशाच्चादिकांची परीक्षा करितो,
ना तरी असाध्य देखोनि व्याधी । अमृतासम दिव्य औषधि । वैद्य सूचि निरवधि । निदानींची ॥
अथवा रोग असाध्य आहे असे पाहताच वैद्य जसा निदानींच्या अमृततुल्य दिव्य औषधीची तत्काळ योजना करतो,
तैसें विवरीतु असे श्रीअनंतु । तया दोहीं सैन्यांआंतु । जयापरी पार्थु । भ्रांती सांडी ॥
त्याप्रमाणे, त्या दोन्ही सैन्यांमध्ये स्थित असलेले भगवान श्रीकृष्ण कोणत्या उपायाने अर्जुन आपला मोह टाकील, याचा विचार करू लागले.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -