घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअमित ठाकरेंच्या पुन्हा संघटनात्मक बैठका; मात्र...

अमित ठाकरेंच्या पुन्हा संघटनात्मक बैठका; मात्र…

Subscribe

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांनी नाशिकमध्ये शहर पदाधिकारी, कार्यकर्त्यासोबत बैठक घेत त्यांची मते जाणून घेतली तसेच मार्गदर्शन केले. सकाळी १० वाजता अमित ठाकरे ‘राजगड’ या मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात पोहचले. टप्प्याटप्प्याने त्यांनी नाशिक पश्चिम तसेच नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील पदाधिकार्‍यांशी संवाद साधला.

मागील २ वर्षापासून अमित ठाकरे यांनी नाशिककडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याआधी तीन ते चार वेळा त्यांनी पक्षातील शाखाध्यक्ष तसेच विद्यार्थी सेनेच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधला होता. शाखाध्यक्ष वगळता मुख्य वाहिनीच्या शहरातील पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. नाशिक महानगरपालिका निहाय नवीन नाशिक, सातपुर, नाशिकरोड तसेच पंचवटी विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. येणार्‍या निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक बकळकटीसाठी या बैठका आयोजित केल्याची माहिती मनसेच्या वतीने देण्यात आली.

- Advertisement -
गटबाजी की चूक; बॅनरवरून वरिष्ठ नेता गायब

अमित ठाकरे नाशिक दौर्‍यावर येणार म्हटल्यावर मनसेची युवा वाहिनी असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह बघायला मिळतो. कार्यकर्त्याकडून अमित यांच्या स्वागतासाठी बॅनर उभारणीपासून ते ढोल, पुष्प आदीची व्यवस्था केली जाते. अमित ठाकरेंच्या स्वागतासाठी मनविसेच्या कार्यकर्त्यांनी शहरात बॅनरबाजी केली. मात्र, या बॅनरवरून पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मित्र असलेल्या डॉ. प्रदीप पवार यांचाच फोटो गायब असल्याने चर्चाना उधाण आले होते. मनसेत झालेल्या पडझडीनंतर डॉ. पवारांनी पक्षाला सावरण्यात मोठे योगदान दिले. मात्र बॅनरवरून त्यांचा फोटो काढून टाकणे यामागे पक्षातील गटबाजी आहे की चुकून फोटो टाकणे राहून गेले अशा अनेक चर्चांना उधाण आले होते.

कार्यकारणीत बदलाचा विचार

येऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात नव्या दमाचे पदाधिकारी असावेत तसेच संघटनेत बदल घडून नवी ऊर्जा संचारावी यासाठी पक्ष कार्यकारणीत बदल होणे आवश्यक आहे. मागील अनेक वर्षापासून कोणताही मोठा बदल झालेला नाही. बदल करण्याआधी चाचपणी व्हावी याकरिता अमित ठाकरे यांचा हा दौरा असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -