घररायगडजिल्ह्यात श्री सदस्यांकडून स्वच्छता मोहीम; खोपोली शहर झाले स्वच्छ

जिल्ह्यात श्री सदस्यांकडून स्वच्छता मोहीम; खोपोली शहर झाले स्वच्छ

Subscribe

महाराष्ट्र भूषण तीर्थरुप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तर्फे थोर निरूपणकार डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्ती निमित्ताने जिल्ह्यात अनेक ठिकाणी हजारो श्री सदस्यांकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. श्री बैठक खोपोली आणि खोपोली नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरात मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

खोपोली: महाराष्ट्र भूषण तीर्थरुप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तर्फे थोर निरूपणकार डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्ती निमित्ताने जिल्ह्यात अनेक ठिकाणी हजारो श्री सदस्यांकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. श्री बैठक खोपोली आणि खोपोली नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरात मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.यावेळी जवळपास ३९ टन कचरा जमा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. प्रतिष्ठानच्यावतीने अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जातात.याचाच एक भाग असलेला बुधवारचा स्वच्छता कार्यक्रम होता.
शहरातील उर्दू शाळा, जनता विद्यालय, नगरपरिषद रुग्णालय, पोलीस ठाणे, शिळफाटा येथील बस स्थानक ,खोपोली गावातील बस स्थानक आदी परिसरात श्री सदस्य आणि नगरपालिका कर्मचार्‍यानी ही स्वच्छता मोहीम राबवली. या स्वच्छता मोहिमेसाठी मुख्याधिकारी दुरे तसेच नगरपरिषदेचे कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले. यानंतर शहरातील परिसरात स्वच्छता दिसून आली.

स्वच्छता हीच ईश्वरसेवा; मुख्याधिकारी भुसे यांचे प्रतिपादन
मुरुड: डॉ नानासाहेबांची स्वछतेची शिकवण जगाने अनुभवली आणि निरोगी आयुष्य जगायचे असेल तर आपला परिसर स्वच्छ ठेवणे कर्तव्य आहे .आपण सगळे त्यांच्या कार्यात सहभागी होऊन देश कार्य करूया हीच खरी देश सेवा ठरेल आपले घर आणि सभोवतालचा परिसर स्वच्छता राहिल यांची काळी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छतेचे महत्त्व जाणले पाहिजे स्वच्छता हीच ईश्वर सेवा आहे असे मत महाराष्ट्र भूषण डॉ नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दी निमित्ये महास्वछता अभियान वेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी पंकज भुसे बोलत होते.
बुधवारी तहसीलदार कार्यालयासमोर तहशीदार रोहन शिंदे यांनी श्रीफळ वाढून व मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी साहित्य पूजन करून हातात झाडू घेऊन महास्वच्छतेला सुरुवात करण्यात आली. माजी नगराध्यक्ष स्नेहा पाटील,नगरसेविका युगा ठाकूर,अविनाश दांडेकर ,महेश मानकर ,महेंद्र चौलकर,प्रवीण बैकर आदी मान्यवर उपस्थित होते. आपासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातीक सर्व रस्ते ७३७ श्रीसदस्यांनी स्वच्छ केले. तालुक्यातून गोळा झालेला २५ टन ओला आणि ३ टन सुका कचरा डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात आला .

- Advertisement -

म्हसळेत स्वच्छतेचा जागर
म्हसळे : येथील ५४४ श्री सदस्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत शहरातील सर्व शासकीय कार्यालय,ग्रामीण रुग्णालय परिसर,बस स्थानक परिसर,विश्रामगृह,प्राथमिक आरोग्य केंद्र,सार्वजनिक वाचनालय,पाभरे चेक पोस्ट ते पेट्रोल पंप पर्यंत शहरातील मुख्य रस्ता,कन्या शाळा,स्टेट बँक,बँक ऑफ इंडिया परिसर,पानपोई, मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली. याच मोहिमेत प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आलेले बॅरिकेट्स स्वच्छ करण्यात आले. स्वच्छता मोहिमेत तहसिलदार घारे,गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ, नगराध्यक्ष अहसल कादिरी, डॉ.महेश मेहता, डॉ.प्रशांत गायकवाड, नगरसेविका राखी करंबे,अंजुमन स्कूल चेअरमेन नासीर मिठागरे,नंदकुमार सावंत,शशिकांत शिर्के,उदयकुमार कळस,अजय करंबे,पंचायतीचे कर्मचारी,अधिकारी,विविध संघटनेचे सर्व सदस्य प्रतिष्ठानचे सदस्य सहभागी झाले होते.स्वच्छता मोहिमेत गोळा केलेला कचरा शहराच्या डपिंग ग्राउंडमध्ये टाकण्यात आला.स्वच्छ्ता मोहिमेत सुका कचरा १५ टन आणि ओला कचरा ५ टन गोळा झाल्याचे श्री सदस्यांनी सांगीतले. कचरा विघटन करुन वाहतूक करण्यासाठी ४ ट्रॅक्टर ३ पिकअप,४ घंटागाडी आणि ५४४ श्री प्रतिष्ठान सदस्यानी सहभाग घेतला.

रसायनीत श्री सदस्यांनी राबविली स्वच्छता मोहीम
रसायनी: स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी थोर निरुपणकार महाराष्ट्र भुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानंच्या सौजन्याने जन्मशताब्दी निमित्त डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी बुधवारी एकदिवसीय स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.यावेळी रसायनी पाताळगंगासह कोन विभागातील हजारो श्री सदस्यांनी सकाळपासूनच उपस्थित राहून स्वच्छता मोहीम राबविली.
मोहोपाडा,रसायनी पाताळगंगासह पनवेल तालुक्यातील हजारो श्री सदस्यांनी बूधवारी सकाळी पनवेल येथील पंचमुखी हनुमान मंदिर ते गार्डन हॉटेल तसेच परिसरातील इतर भागात जमून हातात झाडू,फावडे,घम्याल, पिशव्या घेऊन पनवेल महानगरपालिका परिसरातील मुंबईच्या तसेच पुण्याच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याची स्वच्छता केली. ही मोहिम राज्यासह देशात आणि परदेशातही राबविण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -