घरमुंबईशासनाचा 'कर' बुडवणाऱ्या 'ऑनलाईन लॉटरी' सेंटरवर गुन्हे शाखेची कारवाई

शासनाचा ‘कर’ बुडवणाऱ्या ‘ऑनलाईन लॉटरी’ सेंटरवर गुन्हे शाखेची कारवाई

Subscribe

मुंबई शहरासह राज्यभरात मोठ्या प्रमाणात 'ऑनलाईन लॉटरी' खेळवली जाते. मात्र याचा शासनाला कोणताही 'कर' दिला जात नाही. 'कर' बुडवणाऱ्या 'ऑनलाईन लॉटरी' सेंटरवर धाड टाकल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.

मुंबई शहरासह राज्यभरात ‘ऑनलाइन लॉटरी’ ने धुमाकूळ घातला आहे. मात्र या लॉटरी विक्रते यांच्याकडून शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात येत असून कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्यात येत आहे. एकीकडे शासन सर्वसामान्याकडून जोमात कर वसुली करीत आहे, तर दुसरीकडे लॉटरी विक्रते शासनाची फसवणूक करीत असल्याचे गुन्हेशाखेने टाकलेल्या धाडीत उघडकीस आले आहे.

या शहरामध्ये होते ‘ऑनलाइन लॉटरी’

मुंबई, नवीमुंबई तसेच ठाणे कल्याणसह राज्यातील महत्वाच्या शहरामध्ये ‘ऑनलाइन लॉटरी’ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राजश्री लॉटरी ही अधिकृत ऑनलाइन लॉटरी असून, या प्रमाणेच अनेक ऑनलाइन अधिकृत लॉटरी आहेत, ज्या शासनाचा ‘ कर ‘ नियमित भरणा करतात. मात्र ठिकठिकाणचे लॉटरी विक्रेते या अधिकृत ऑनलाइन लॉटरी मशीनमधून निघणारे लॉटरीचे तिकीट खेळणाऱ्या ग्राहकाला न देता त्याला हाताने चिट्टी बनवून देत असल्याचा प्रकार सर्वत्र सुरू आहे. आपली चोरी पकडल्या जाऊ नये म्हणून विक्रेत्यांकडून ग्राहकाला केवळ १० टक्के अधिकृत लॉटरीचे कुपन दिले जाते आणि इतर ग्राहकांना एका कागदावर त्याने लावलेला क्रमांक हाताने लिहून दिला जातो. तसेच ती पूर्ण रक्कम स्वतःच्या खिशात टाकून शासनाची आणि ऑनलाइन लॉटरी कंपन्यांची फसवणूक केली जात आहे.

- Advertisement -

काळाबाजार उघडकीस

ऑनलाइन लॉटरी मधून शासनाला येणार कर मागील काही वर्षपासून कमी झाला होता, त्याचे कारण शोधण्यासाठी ‘कर’ विभागाने कंपन्यांकडे चौकशी केली, कंपन्यांचा व्यवसायात घट झाली असल्याचे लक्षात आले. अचानक झालेल्या व्यवसायातील घट शोधून काढण्यासाठी कंपन्यांनी जागोजागी आपले प्रतिनिधी गुप्तरीत्या पाठवून जाणून घेतले, त्यात या विक्रेत्यांचा हा काळाबाजार उघडकीस आला आहे. कंपनी आणि शासनाची होणारी फसवणूक रोखण्यासाठी ऑनलाइन लॉटरी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी पाऊले उचलुन कायदेशीतरीत्या या विक्रेत्यांवर कारवाई होण्यासाठी मुंबई, ठाणे आणि नवीमुबंई येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या ही बाब निदर्शनात आणून देऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला

दरम्यान गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी मागील आठवड्यापासून मुंबईतील शिवाजी पार्क, आग्रीपाडा, काळाचौकी भायखळासह उपनगरातील अनेक ठिकाणी ऑनलाईन लॉटरी सेंटरवर धाडसत्र सुरु केले आहे. या धाडसत्रात पोलिसांनी सुमारे २५ ते ३० जणांना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हे फसवणुकीसह बनावट कागदपत्रे तयार करणे या प्रकरणी गुन्हे दखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

चार जणांना अटक

नवीमुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेने देखील दोन दिवसांपूर्वी कोपरखैराणे या ठिकाणी असलेल्या ऑनलाईन लॉटरी सेंटरवर धाडी टाकून ४ जणांना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर अटक करण्यात आलेल्या लॉटरी विक्रेत्यांचे परवाने कंपनीकडून रद्द केले जातील असे सांगण्यात आले आहे. याबाबतची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मुंबईचे सहपोलीस आयुक्त (गुन्हे) यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

आम्ही जेव्हा ऑनलाईन लॉटरी लावण्यासाठी येतो, त्या वेळी आम्हाला एका कागदावर लिहून दिले जाते. आम्ही या बाबत विचारले असता तुमचा क्रमांक लागल्यावर जिंकलेली रक्कम देण्यात येईल असे सांगण्यात येते. लॉटरी लागल्यावर आम्हाला जिंकलेली रक्कम मिळते म्हणून आमची काही हरकत नसते.  – पंढरीनाथ लूकडे, ग्राहक

ऑनलाईन लॉटरी विक्रेते हे स्वतःच्या फायद्यासाठी अधिकृत ऑनलाईन लॉटरी मशीनचा वापर न करता, ग्राहकाला हाताने एका कागदावर लिहून देतात. त्याची नोंद कुठेही होत नसल्यामुळे हा पैसा विक्रेत्यांच्या खिशात जातो. त्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात कर बुडत होता. हा प्रकार केवळ मुंबई, ठाणे पुरता मर्यादित नसून राज्याच्या प्रत्येक महत्वाच्या शहरात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यामुळे शासनाची फसवणूक सुरु आहे.  – पोलीस अधिकारी


वाचा – गुन्हेगारांच्या हायटेक यंत्रणेपुढे सायबर पोलीस हताश

वाचा – सायबर युगातील लखोबा लोखंडे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -