घरक्राइमलालबाग हत्याकांडचं यूपी-बंगाल कनेक्शन, 'त्या' दोन वेटर्सपैकी एकाला अटक

लालबाग हत्याकांडचं यूपी-बंगाल कनेक्शन, ‘त्या’ दोन वेटर्सपैकी एकाला अटक

Subscribe

पोलीस सध्या मुलीची चौकशी करत असून आता या हत्या प्रकरणात यूपी-बंगाल कनेक्शन आता समोर आलं आहे.

मुंबईच्या लागबागमधील हत्या प्रकरणाने सगळेच हादरून गेले आहेत. एका २३ वर्षीय मुलीने आपल्या विधवा आईची हत्या करून मृतदेहाचे पाच तुकडे करुन कपाटात भरुन ठेवले होते. याहूनही धक्कादायक म्हणजे घरात मृतदेहाचे तुकडे ठेवून ही मुलगी गेले तीन महिन्यांपासून राहत होती. पोलिसांनी रिंकलला ताब्यात घेतले असून तिची अवस्था विचित्र होती. ती स्वत:च्याच विचारात हरवल्यासारखी वाटत होती. तिने अनेक दिवसांपासून अंघोळही केली नव्हती. पोलीस सध्या तिच्याकडे चौकशी करत असून आता या हत्या प्रकरणात यूपी-बंगाल कनेक्शन आता समोर आलं आहे.

मुंबईत मंगळवारच्या मध्यरात्री लालबागमधील पेरू कंपाउंड परिसरात असलेल्या एका फ्लॅटमधून रात्री उशिरा ग्र वास येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्या घराची पाहणी केली. कपाट तपासलं असता, त्यामध्ये प्लास्टिकची एक मोठी पिशवी आढळली. या पिशवीमध्ये एका ५० -५५ वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यानंतर फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले फ्लॅट सील करण्यात आला. वीणा जैन (वय ५५) असे मृत महिलेचे नाव असून, पोलिसांनी तिच्या हत्येप्रकरणी मुलगी रिंकल जैन (वय २४) हिला अटक केली होती. पोलिसांना रिंकलच्या घरात फरशी कापण्याची मशिन, कोयता आणि सुरी मिळाली होती. या हत्यारांचा वापर करून वीणा जैन यांची हत्या करून त्यांच्या शरीराचे तुकडे केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार पोलीस तिच्याकडे चौकशी करत असून सुरूवातीला रिंकल काहीच बोलत नव्हती. परंतू आता या हत्या प्रकरणात आणखी एक नवी माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

आपल्या आईचा मृत्यू एका अपघातामुळे झाला असल्याचं रिंकलने म्हटलंय. त्यामुळे हे हत्या प्रकरण आता वेगळ्या वळणाला जाऊ लागले आहे. तिची आई इमारतीमधील सार्वजनिक शौचालयात जात असताना पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली पडली होती असं रिंकलने पोलिसांना सांगितलंय. या अपघातात तिची आई जखमी झाली. इमारतीच्या तळमजल्यावर असणाऱ्या चायनीजच्या दुकानातील दोन मुलांनी तिला पुन्हा पहिल्या मजल्यावर घरी आणून सोडले, असे रिंकलने पोलिसांना सांगितले. यापुढे काय घडलं हे मात्र अद्यार रिंकलने सांगितलं नाही. अपघातानंतर आईसोबत काय घडलं, तिचा मृत्यू कसा झाला आणि मृतदेहाचे तुकडे कोणी केले याबाबत रिंकलने काहीच माहिती दिली नाही.

लालबाग हत्या प्रकरणाच्या चौकशीत समोर आलेल्या चायनीज दुकानातील त्या दोन जणांचा पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासात या हत्या प्रकरणाचं कनेक्शन थेट युपी आणि बंगालपर्यंत पोहोचलं. यात मुंबई पोलिसांना यश आलं असून उत्तर प्रदेशमधून एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या तरुणाला आता उत्तर प्रदेशहून मुंबईमध्ये आणलं जातं आहे. आईची हत्या केल्यानंतर मुलगी रिंकल लालबागमधल्याच एका सँडविच विकणाऱ्या तरुणाच्या संपर्कात होती असं तपासात समोर आलं. या तरूणाच्या चौकशीतून काय समोर येतंय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -