घरदेश-विदेशWorld Sparrow Day 2023 : चिऊताई गेली कुणीकडे ?

World Sparrow Day 2023 : चिऊताई गेली कुणीकडे ?

Subscribe

चिऊताईचा आज स्पेशल डे आहे.

आज आहे जागतिक चिमणी दिन World Sparrow Day. घरात लहान बाळं आलं की त्याला याच चिऊकाऊच्या गोष्टी सांगून पक्षांच्या जगाची ओळख करुन देण्यात येते.  त्यातही अंगणात, खिडकीत  इटुकल्या पिटुकल्या चिऊताईचा चिवचिवाट म्हणजे भारी गंमत. तिच गोल गोल फिरणं, दाणं टिपणं,  बघणं जसं लहानग्यांसाठी अप्रुप तसचं ते वयस्कांसाठीही. याच चिऊताईचा आज स्पेशल डे आहे.

- Advertisement -

चिऊताईच्या जगभऱात अनेक जाती आहेत. त्यातील काही शहरांमध्ये आढळतात तर काही घनदाट जंगलामध्ये. अशा २६ जातीच्या चिमण्यांची जगभरात नोंद केली आहे. आपल्या घरात, अंगणात , खिडकीत सतत गोंगाट घालताना दिसते तिला ‘हाऊस स्पॅरो’ (House Sparrow) म्हणतात. चिमणीच्या २६ जातीं पैकी २३ प्रकारच्या चिमण्या आपण फोटोत तर कधी वेगवेगळ्या प्रांतात, देशात, परदेशात बघायला मिळतात. तर इतर जणांच अस्तित्वच दुर्मिळ झाल्याने त्या दूरदेशी कुठेतरी असाव्यात असा अंदाज लावला जातो.

- Advertisement -

 

वाढत्या जागतिकीकरणामुळे वातावरण प्रदूषित होऊ लागलं, शहरात वाढणाऱ्या मोबाईल टॉवर्स त्यातून निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरींमुळे चिऊताई शहरातून दिसेनाशी झाली. वायू प्रदूषणामुळे अनेक चिमण्या मृत्यूमुखीही पडल्या. तर किटकनाशक फवारलेले धान्य खाल्याने अनेक चिमण्या तडफडून मेल्या.

जंगल तोडून शहर वसत असल्याने चिऊताईला हक्काच घर देणारी वृक्षही गायब झाली आहेत. यामुळे घराच्या छपरांवर, गॅलरीच्या कोपऱ्यात, अडगळीत शहरात उरल्या सुरलेल्या चिऊताई आसरा शोधत आहेत.

यामुळे समाजावर पर्यावरणाचा समतोल राखणारी ही पाखरं जपण्याची जबाबदारीही वाढली आहे. फार नाही पण कधी खिडकीत तर कधी अंगणात, बाल्कनीत त्यांच्यासाठी धान्याची वाटी ठेवावी. कडाक्याच्या या उन्हात वाटीभर पाणी ठेवण्यास आपण सुरुवात केली तर माणसांपासून दुरावलेली ही पाखरं नव्या उमेदीने बकाल शहरांकडे माघारी फिरतील आणि पुन्हा एकदा चिमण्यांचा चिवचिवाट आपल्या, खिडकीत तरी कधी अंगणात ऐकायला मिळेल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -