घरमहाराष्ट्रनाशिकपालकांच्या रोषानंतरही ‘होरायझन’चे शुल्कवाढ मागे घेण्यास नकार

पालकांच्या रोषानंतरही ‘होरायझन’चे शुल्कवाढ मागे घेण्यास नकार

Subscribe

नाशिक : मविप्र संस्थेच्या उदोजी अर्ली होरायझन आयसीएसई शाळा प्रशासनाने सीनिअर केजीच्या शैक्षणिक वर्षासाठी १५ टक्के शुल्कवाढ केल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. सोमवारी (दि.२०) मविप्रच्या पदाधिकार्‍यांना पालकांच्या रोषाला जावे लागले. मात्र, शुल्कवाढ योग्य असून, डिजिटल सुविधांसाठी केल्याने कपात केली जाणार नसल्याचे पदाधिकार्‍यांनी पालकांना सांगितले.

गंगापूररोडवरील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या उदोजी अर्ली होरायझन अकॅडमी शाळेत शनिवारी (दि.१८) पालक सभा बोलावण्यात आली होती. यावेळी पुढील शैक्षणिक वर्षासाठी १५ टक्के वाढ करण्यात आली. शाळेकडून मिळणार्‍या अभ्यासक्रमाच्या किटसाठी मार्चअखेर ६ हजार शुल्क भरण्यास सांगण्यात आले. शाळा प्रशासनाच्या या निर्णयाने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

- Advertisement -

शुल्कवाढीविरोधात शनिवारी (दि.१८) पालक रस्त्यावर उतरले होते. ही शुल्कवाढ मागे घ्यावी, अशी मागणी पालकांनी शिक्षणाधिकार्‍यांकडे केली होती. यासंदर्भात शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. सोमवारी पालकांनी सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे यांची भेट घेत शुल्ककपात करण्याची मागणी केली. शिवाय, होरायझनमधील असुविधांचा पाडा वाचून दाखवला. त्यावेळी पदाधिकार्‍यांनी पालकांची समजूत काढत शुल्कवाढीमागील कारणे सांगितले. तीन वर्षांनंतर शुल्कवाढ करण्यात आली आहे. इंधनदरात वाढ झाल्याने तीन वर्षांनी स्कूलबसच्या शुल्कातही वाढ केली आहे. शिवाय, शाळा डिजिटल केली जाणार असल्याने ही वाढ असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्याध्यापिकांना पालकांशी सुसंवाद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पदाधिकार्‍यांनी पालकांना सांगितले. यावेळी पालकांनी शुल्क दोन टप्प्यांत भरण्याची सुविधा द्या, असे सांगितले असता पदाधिकार्‍यांनी दोन टप्प्यांत शुल्क भरता येईल, असे सांगितले. दरम्यान, दिवसभर मविप्रच्या मुख्य कार्यालयाबाहेर पालकांनी गर्दी केल्याने तणावमय परिस्थिती होती.

शुल्कवाढीमध्ये कपात करण्यासाठी मविप्रच्या पदाधिकार्‍यांशी सोमवारी (दि.२०) दुपारी ३ वाजता चर्चा झाली. शुल्कवाढ डिजिटल लॅब, रोबोटिक शिक्षणासह इतर शैक्षणिक सुविधांमुळे करण्यात आली आहे. शुल्क दोन टप्प्यात भरता येईल, असे आल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले. : डॉ. पंकज वाघ, पालक

डिजिटल सुविधांसह इतर सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत. शुल्कवाढ नियमात केली असल्याने कोणतीही कपात केली जाणार नाही. पालकांना दोन टप्प्यात शुल्क भरता येणार आहे. : अ‍ॅड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -