Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश राहुल गांधींची 'मीर जाफर'शी तुलना; परदेशातील वक्तव्यावरून भाजपा माफीवर ठाम

राहुल गांधींची ‘मीर जाफर’शी तुलना; परदेशातील वक्तव्यावरून भाजपा माफीवर ठाम

Subscribe

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लंडनमध्ये भारतातील लोकशाहीसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे भाजपाच्या निशाण्यावर आहे. संसदेच्या आत आणि बाहेर भाजपा नेते राहुल गांधींवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. लंडनमधील वक्तव्यावरून राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपकडून सातत्याने केली जात आहे. त्यातच आता भाजपाने राहुल गांधींची तुलना ‘मीर जाफर’शी केली आहे.

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी मंगळवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. संबित राजपुत्राला नवाब व्हायचे आहे आणि नवाब होण्यासाठी राजकुमारने ईस्ट इंडिया कंपनीची मदत मागितली आहे. माफी न मागता राहुल गांधी यातून सहीसलामत सुटतील, असे नाही. त्यांना माफी मागावीच लागेल आणि आम्ही ती घेतल्याशिवाय राहणार नाही, असे संबित पात्रा यांनी ठामपणे सांगितले.

- Advertisement -

राहुल गांधी यांना राफेल प्रकरणातही माफी मागावी लागली होती आणि आता त्यांना संसदेतही माफी मागावी लागेल. नवाब बनण्यासाठी मीर जाफरने जे केले होते आणि राहुल गांधी यांनी लंडनमध्ये जे केले… दोन्ही तेच आहे. राजपुत्राला नवाब व्हायचे आहे. आजच्या मीर जाफरला माफी मागावीच लागेल. राजकुमार… हे चालणार नाही, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

काँग्रेसकडून भारताची बदनामी
काँग्रेस आणि राहुल गांधींचे सततचे षड्यंत्र सुरूचेही भाजप नेत्याने म्हटले आहे. त्यांचा संसदेतील सहभाग अत्यल्प असतो आणि तेच सांगतात की, त्यांना कोणी बोलू देत नाही! राहुल गांधी यांनी आपल्या टिप्पणीद्वारे भारतातील लोकशाहीच्या रक्षणासाठी बाहेरच्या देशांना येण्याचे खुले निमंत्रण दिले आहे. मणिशंकर अय्यर आणि राहुल गांधी हेच काम करत आहेत. दोघेही भारताची बदनामी करत आहेत. मीर जाफरने नवाब होण्यासाठी काय केले? आपली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी त्याने ईस्ट इंडिया कंपनीची मदत घेतली होती आणि राहुल गांधी यांनाही तेच करायचे आहे, असे ते म्हणाले.

- Advertisment -