घरदेश-विदेशपुतीन यांना अटक झाली तर जगावर होईल बॉम्बहल्ला; रशियाची जगाला थेट धमकी

पुतीन यांना अटक झाली तर जगावर होईल बॉम्बहल्ला; रशियाची जगाला थेट धमकी

Subscribe

वर्षभराहून अधिक काळ लोटला तरीदेखील रशिया – युक्रेन युद्ध मात्र अद्याप संपलेलं नाही. ते कधी संपेल याबाबतदेखील काहीही सांगू शकत नाही. त्यातच पुतीन यांना आयसीसीने अटकेचे वाॅरंट जारी केले. त्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना जर अटक झाली तर संपूर्ण जगाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी थेट धमकीच पुतिन यांचे निकटवर्तीय असलेले माजी राष्ट्राध्यक्ष आणि पुतीन यांच्या सुरक्षा कौन्सिलचे विद्यमान उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी दिली आहे.

…तर आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयावर क्षेपणास्त्र आदळेल

आंतरराष्ट्रीय न्यायालयाला मेदवेदेव यांनी सांगितले की, असं होऊ शकतं की, उत्तर समुद्रातून एक हायपरसोनिक रशियन क्षेपणास्त्र हेग स्थित आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयावर आदळू शकते. आंतरारष्ट्रीय गुन्हे न्यायालयातील न्यायाधीशांनी आता आकाशावर लक्ष ठेवावं, अशी धमकीही मेदवेदेव यांनी दिली आहे. युक्रेनविरोधात युद्ध पुकारणे आणि युक्रेनियन मुलांना डिपोर्ट केल्याने आतंरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात अटक वाॅरंट जारी केले आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: ठाकरे-फडणवीस यांच्यात नवी युती? राऊत म्हणतात, विधिमंडळात जाण्याचा रस्ता एकच…,)

ICC ला मान्यताच नाही? 

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बजावलेले वाॅरंट अर्थहीन असल्याचे रशियाकडून सांगण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय अर्थात ICC ला रशिया, चीन किंवा अमेरिकेकडून मान्यताच मिळालेली नाही. त्यामुळे त्यांनी बजावलेल्या या अटक वाॅरंटला काहीच अर्थ नसल्याचे म्हटले जात आहे. आम्ही आयसीसीने (ICC) जारी केलेले अटक वाॅरंट मानत नाहीत, असे दिमित्री मेदवेदेव म्हणाले.

- Advertisement -

युक्रेनने रशियाबद्दल काय म्हटले?

समोर आलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या लष्कराच्या कमांडरने सांगितले की, आमचे सैन्य लवकरच प्रतिआक्रमण सुरू करेल. कारण रशियाचा पूर्व युक्रेनच्या बाखमुत शहरावर ताबा मिळवू न शकल्याने कमकुवत झाला आहे. युक्रेनियन अधिकार्‍यांनी सांगितले की, त्याच्या हवाई संरक्षण दलाने ओडेसा प्रदेशात डागलेल्या दोन क्रूझ क्षेपणास्त्रांना रोखले. ओडेसा प्रदेशात KH-59 क्षेपणास्त्रे डागण्याची ही या आठवड्यातील दुसरी वेळ आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -