घरमुंबईगॅस सिलिंडर सबसिडीबाबत सरकारची मोठी घोषणा; कोट्यावधी कुटुंबाला मिळेल दिलासा

गॅस सिलिंडर सबसिडीबाबत सरकारची मोठी घोषणा; कोट्यावधी कुटुंबाला मिळेल दिलासा

Subscribe

केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरवर सबसिडी जाहीर केली आहे. अशाप्रकारे या योजनेच्या कोटीहून अधिक लाभार्थ्यांसाठी अनुदानाचा कालावधी आणखी एका वर्षाने वाढवण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने शुक्रवारी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत एक मोठी घोषणा केली आहे. सरकारच्या या घोषणेमुळे आता सर्वसामान्य कुटुंबाला मोठा दिलासा मिळणार आहे.

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याबरोबरच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठीही आनंदाची बातमी दिली आहे. केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरवर सबसिडी जाहीर केली आहे. अशाप्रकारे या योजनेच्या कोटीहून अधिक लाभार्थ्यांसाठी अनुदानाचा कालावधी आणखी एका वर्षाने वाढवण्यात आला आहे.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहीती दिली आहे. ही माहिती देत असताना ठाकूर म्हणाले की, 2022 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एका वर्षात 12 सिलिंडर आणि एका सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून. आंतरराष्ट्रीय किमतीत कोणताही मोठा बदल नसल्यामुळे ही सबसिडी आणखी एक वर्ष वाढवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, विविध आंतरराष्ट्रीय घाडमोडींमुळे एलपीजीची आंतरराष्ट्रीय किंमत झपाट्याने वाढली आहे. अशा परिस्थितीत, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एलपीजीच्या वाढलेल्या किंमतीपासून वाचवणे महत्त्वाचे आहे.

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा

1 मार्च 2023 पर्यंत, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे 9.59 कोटी लाभार्थी आहेत. विविध भू- राजकीय कारणांमुळे एलपीजीच्या आंतरराष्ट्रीय किमतीत मोठी वाढ झाल्याचे सरकारी प्रकाशनात म्हटले आहे. PMUY लाभार्थ्यांसाठी या योजनेची तारीख वाढवण्याचा मुख्य उद्देश गरिबांना एलपीजीच्या चढ्या किमतींपासून वाचवणे हा आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: गायिका आशाताई भोसले म्हणजे महाराष्ट्राची शान, मुख्यमंत्र्यांकडून कौतुकोद्गार )

कोणाला मिळणार फायदा?

या योजनेचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे. अशावेळी देशातील PMUY ग्राहकांचा सरासरी LPG वापर 2019-20 मधील 3.01 रिफिलवरुन 20 टक्क्यांनी वाढून 2021-22 मध्ये 3.68 झाला आहे.

PMUY म्हणजे काय?

या योजनेअंतर्गत वर्षभरात 12 अनुदानित गॅस सिलिंडर दिले जातात. प्रत्येक सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी मिळते. या योजनेअंतर्गत वर्षभरात 2400 रुपयांपर्यंतचा लाभ ग्राहकांना मिळतो. PMUY ग्राहकांमध्ये नियमित एलपीजीचा अवलंब आणि वापर सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -