घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांचा सभात्याग, 'हे' दोन मुद्दे ठरले कारणीभूत

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांचा सभात्याग, ‘हे’ दोन मुद्दे ठरले कारणीभूत

Subscribe

Maharashtra Assembly Budget 2023 | सभागृह सुरू होताच विधान सभेतील विरोधी पक्षातील आमदारांनी सभात्याग केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय घेण्यास वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी आज सभात्याग केला.

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – राज्याचे विधिमंडळ अर्थसंकल्पलीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आजच्या दिवसाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं. आज महत्त्वाचे ठराव, निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, सभागृह सुरू होताच विधान सभेतील विरोधी पक्षातील आमदारांनी सभात्याग केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय घेण्यास वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी आज सभात्याग केला.

हेही वाचा – नाशिकवर अन्याय, अर्थसंकल्पात सिंहस्थ कुंभमेळयाचा उल्लेखही नाही; भुजबळांनी व्यक्त केली खंत

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन विधानभवन परिसरात सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आले होते. याप्रकरणी बाळासाहेब थोरात यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी सभागृहात मुद्दा मांडला. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिले होते. मात्र, अद्यापही संबंधितांवर कारवाई झाली नसल्याचे विरोधकांकडून सांगण्यात आले. यासंदर्भात वरिष्ठ सभागृहातील उपसभापतींसोबत चर्चा होणार असून विधानभवन परिसरात आचारसंहिता तयार करण्यात येणार आहे. आचारसंहितेबाबत एसओपी तयार झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई होईल, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आज स्पष्ट केले. परंतु, तरीही विरोधकांनी या मुद्द्यावरून सभागृहात गदारोळ केला.

तर, दुसरीकडे मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृतमहोत्सव काल सुरू आहे. यानिमित्ताने कार्यक्रम निश्चित करण्यात यावा याकरता हिवाळी अधिवेशनातही चर्चा झाली. परंतु, ठोस निर्णय होऊ शकला नाही. याबाबतचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशात करू असे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते. परंतु, तरीही अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चार आठवड्यांच्या कामकाजात याविषयावर चर्चा होऊ शकली नाही. तसंच, या कार्यक्रमाबाबत एक ओळीचा ठराव मान्य नाही. याप्रकरणात सरकार चालढकलपणा करत आहे. याप्रकरणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केली. परंतु, ही मागणी फेटाळण्यात आली. याविषयावर आता पुढच्या पावसाळी अधिवेशनात चर्चा होईल, अशी ग्वाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. मात्र, विरोधकांचे समाधान न झाल्याने त्यांनी सभात्याग केला.

- Advertisement -

हेही वाचा -मोदींविरोधात घोषणाबाजी, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ठणकावलं; ज्यांच्या नसानसांत…

सभात्याग केल्यानंतर विरोधकांच्या प्रतिक्रिया

मराठवाडामुक्ती संग्राम मोठ्या मनाने निजामशाहाच्या अख्यारित होता. महाराष्ट्रात समाविष्ट करून संयुक्त महाराष्ट्र झाला. चार आठवड्यांच्या अधिवेशनात मराठवाडा मुक्तिसंग्राम कार्यक्रमासाठी चर्चा झाली नाही. त्यांनी शब्द दिला होता की निश्चित बैठक होईल. एका ओळीचा ठराव आम्हाला मान्य नाही. दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवा. अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने कामकाजात विषय घेता नाही आला तर विशेष अधिवेशन बोलवा. कमिटी केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. परंतु, कमिटी तर आम्हीच नेमली होती. चार पालकमंत्र्यांची समिती नेमली आहे. एककली कारभार सुरू असल्याने महाविकास आघाडीने निषेध केला – अजित पवार

पायऱ्यांवर आंदोलन सुरू असतं. वर्षांनुवर्षे ते सुरू आहे. पण यासाठीही काही संकेत आहेत. दोन दिवसांपूर्वी जे घडलं ते विधानभवनाच्या इतिहासात दुर्दैवी घटना आहे. राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्याविरोधात घोषणा आणि कृती निषेधार्य आहे. त्यांच्याकडेही राष्ट्रीय नेते आहेत. आमच्याकडेही पायताणे आहेत हे विसरून चालणार नाही. त्यामुळे कडक कारवाई करावी असा आग्रह धरला होता. राष्ट्रीय नेत्यांबाबत असं पुढेही घडण्याची शक्यता आहे. दुर्दैवाने सकाळी आज जाहीर केलं नाही. अध्यक्षांचा वेळकाढूपणा सुरू आहे. त्यांनी निरपेक्ष राहिलं पाहिजे. या गोष्टींचा निषेध करतोय. जोडे मारणाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे. या सगळ्याबाबतीत नकारात्मक भूमिका आहे. ही आपल्या परंपरेला साजेशी नाही – बाळासाहेब थोरात

घटनाबाह्य सरकार पहिल्यांदा परिसरात पायऱ्यांवर वेडेवाकडे प्रकार करतंय. मी पहिल्यांदाच निवडून आलोय. त्याआधी अनेकदा गॅलरी येऊन बसायचो. ज्येष्ठ सदस्यांपर्यंत एक राजकीय संस्कृती पाळत आलो आहोत. सरकारमध्ये काम करत असताना आणि आता विरोधी पक्षात काम करत असातनाही आम्हाला एक कार्यपद्धती सांगत असतात आणि चौकट दिली जाते. परवाचा प्रकार धक्कादायक होता. टोकाची भूमिका कोणी घ्यायची नाही, अशी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. वेडेवाकडे शब्द वापरू नये. विधानभवनाच्या परिसर मतमतांतरे असू शकतात, राग असू शकतो. पण कोणत्या शब्दात आणि पद्धतीत झालं पाहिजे यावर विचार करावा लागेल. गद्दार गँगमधील लोक बंदुकीने गोळी चालवतात – आदित्य ठाकरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -