घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रप्रेमसंबंधास अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच काढला काटा

प्रेमसंबंधास अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच काढला काटा

Subscribe

नाशिक : प्रेमसंबंधात अडथळा येत असलेल्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना सटाण्यात उघडकीस आली आहे. पोलिसांनी अवघ्या आठ तासांत अनोळखी मृतदेहाची ओळख पटवत हत्येचा उलगडा केला. दत्तात्रय राजाराम ठाकरे (वय 40, रा. लाडूद, ता. बागलाण) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

बागलाण तालुक्यातील जायखेडा स्मशानभूमीलगतच्या मोसमनदी काठावर शुक्रवारी (दि.२४) सकाळी मृतदेह आढळून आला. गाव परिसरात घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. जायखेडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल घटनेचा आढावा घेतला. मात्र, मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी जायखेडा पोलिसांसमोर आव्हान होते. पोलिसांनी वेगाने तपासत करत मृत व्यक्ती लाडुद येथील दत्तात्रेय ठाकरे असल्याचे उघड झाले. मृत ठाकरेच्या डोक्यावर व चेहर्‍यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळून आल्या.

- Advertisement -

पोलीस तपासात पत्नीने ठाकरेंचा खून केल्याचे समोर आले. मृत दत्तात्रेय ठाकरे याच्या पत्नीचे एका पुरुषासोबत प्रेमसंबंध आहेत. प्रेमसंबंधास अडसर ठरत असल्याने कट रचून दोघांनी ठाकरे याचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले. सहायक पोलीस निरीक्षक सागर शिंपी, पोलीस उपनिरीक्षक संजय वाघमारे, उपनिरीक्षक काळे, सुनील पाटील, गोपीनाथ भोये, राजेश सावळे, पोलीस नाईक योगेश क्षीरसागर, उमेश भदाणे, शरद भगरे, अरविंद ढवळे, प्रदीप बहीरम, सुभाष चोपडा यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी परिश्रम घेतले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -