घरदेश-विदेश1 एप्रिलपासून सामान्यांना बसणार महागाईची झळ, CNG-PNG दरांबाबत मोठी अपडेट

1 एप्रिलपासून सामान्यांना बसणार महागाईची झळ, CNG-PNG दरांबाबत मोठी अपडेट

Subscribe

CNG-PNG Price Hike | गेल्यावेळी नैसर्गिक वायूच्या किमतीत ४० टक्क्यांनी वाढ झाली होती. आता यावेळेला किती टक्क्यांनी वाढ होईल, हे पाहावं लागेल. १ एप्रिल रोजी नवे दर जाहीर होतील.

CNG-PNG Price Hike | नवी दिल्ली – महागाईचे चटके सोसणाऱ्या नागरिकांना आता आणखी एक धक्का बसणार आहे. येत्या नव्या आर्थिक वर्षापासून सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत (CNG-PNG Hike) वाढ होणार आहे. खाद्यपदार्थ, कच्चे तेल, फळांच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना आता इंधनातही वाढ होणार असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला अधिकचा भुर्दंड बसणार आहे.

हेही वाचा – महागाईने हिरावला हार-कंगनचा गोडवा; २० टक्क्यांनी किंमती वाढल्या

- Advertisement -

येत्या काळात नैसर्गिक वायूच्या (Natural Gas) किमती वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता आहे. १ एप्रिल रोजी याबाबतचा निर्णय जाहीर होईल. नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्यानंतर सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत वाढ होऊ शकते. त्यामुळे वाहनचालकांच्या खिशाला भुर्दंड बसणार आहे. तसंच, या दरवाढीमुळे टॅक्सी आणि रिक्षा भाडेही वाढू शकतात.

नैसर्गिक वायूंची किंमत वर्षांतून दोनवेळा निश्चित केली जाते. या नैसर्गिक वायूपासून सीएनजी आणि पीजएनजी बनवलं जातं. तसंच, नैसर्गिक वायूचा वापर वीज आणि खते निर्मितीसाठीही केला जातो. गेल्यावेळी नैसर्गिक वायूच्या किमतीत ४० टक्क्यांनी वाढ झाली होती. आता यावेळेला किती टक्क्यांनी वाढ होईल, हे पाहावं लागेल. १ एप्रिल रोजी नवे दर जाहीर होतील.

- Advertisement -

हेही वाचा – भारतात मिळणार इथेनॉल मिश्रित पेट्रोल, जाणून घ्या नेमका काय होणार फायदा?

आज सीएनजीचे दर ८० रुपये प्रतिलिटर आहे, तर पीएनजीचा दर जवळपास २५ रुपये प्रतिलिटर आहे. १ एप्रिल रोजी नैसर्गिक वायूच्या किमती ठरवण्यात आल्यानंतर सीएनजी आणि पीएनजीचे दर वाढतील. त्यामुळे नियमित वाहतूक करणाऱ्या चालकांना फटका बसणार आहे. तर, ऑटो आणि रिक्षाचेही भाडे वाढतील. त्यामुळे हे दर नियंत्रणात ठेवण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, नैसर्गिक वायूचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी मंत्रिमंडळ बैठक होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -