घरक्रीडाWorld Boxing Championship : भारताला चार सुवर्णपदक, निखत-लवलिना यांची शेवटच्या दिवशी कमाल

World Boxing Championship : भारताला चार सुवर्णपदक, निखत-लवलिना यांची शेवटच्या दिवशी कमाल

Subscribe

नवी दिल्ली : महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय बॉक्सर्सनी सुवर्ण कामगिरी केली आहे. नीतू घंघासने ४५-४८ किलो गटात आणि स्वीटी बुराने 75-81 किलो गटात शनिवारी सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर रविवारी (२६ मार्च) निखत जरीनने 48-50 किलो गटात आणि लव्हलिना बोरगोहेनने 70-75 किलो गटात सुवर्णपदक जिंकून भारताला चौथे सुवर्णपदक मिळवून दिले.

भारताने तब्बल 17 वर्षांनंतर महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये चार सुवर्णपदके जिंकली आहेत. भारताची राजधानी दिल्ली येथे पार पडलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या बॉक्सर्सचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अभिनंदन केले आहे.

- Advertisement -

नीतू घंघास हिने ४५ ते ४८ किलो वजनी गटात मंगोलियन कुस्तीपटूला हरवून सुवर्णपदक जिंकण्याची सुरूवात केली होती. तिने मंगोलियाच्या लुत्साईखानचा पराभव केला. या सामन्यात प्रेक्षकांना शेवटपर्यंत विजेत्याचा अंदाज लावणे कठीण झाले होते. सामन्याचा निकाल जाहीर होण्याआधीच दोन्ही कुस्तीपटू विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सज्ज झाल्या होत्या, मात्र अखेरीस भारतीय कुस्तीपटू विजयी झाल्यामुळे मंगोलियन कुस्तीपटूच्या चेहऱ्यावर निराशा दिसून आली.

नीतूनंतर स्वीटी बुरा हिने 75-81 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. स्वीटीने चीनच्या लीना वँगचा पराभव केला. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये स्विटीकडे 3-2 अशी आघाडी होती. मात्र तिसऱ्या फेरीनंतर निर्णय फेरविचारासाठी गेला आणि स्वीटीला विजय घोषित करण्यात आले. त्यामुळे भारताला स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक मिळाले.

- Advertisement -

दोन सुवर्णपदक जिंकल्यामुळे रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात निखत जरीनने भारताला तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले. तिने अंतिम फेरीत व्हिएतनामच्या गुयेन थी टॅमचा पराभव केला. तिने सुरुवातीपासूनच चमकदार कामगिरी करताना पहिल्या फेरीत 5-0 अशी आघाडी घेत सामना एकतर्फी केला. दुसऱ्या फेरीत तिने आघाडी कायम ठेवली आणि तिसर्‍या फेरीत व्हिएतनामी बॉक्सरवर पंचेसचा पाऊस पाडल्यामुळे टॅमची प्रकृती बिघडल्यामुळे काही काळ सामना थांबवला होता. त्यानंतर 5-0 अशा फरकाने सामना जिंकत सलग दुसऱ्यांदा महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले.

भारताला तीन सुवर्णपदक मिळाल्यानंतर लोव्हलिना बोरगोहेनने 70-75 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून देशाला चौथे पदक मिळवून दिले. तिने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कॅटलिन अॅन पार्करचा पराभव केला. या सामन्यात दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली लढत झाली. लोव्हलिनाने पहिल्या फेरीत ३-२ अशा पुढाकार घेतला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने दुसरी फेरी जिंकत सामन्यात आपल वर्चस्व कायम राखले. त्यामुळे तिसऱ्या आणि शेवटच्या फेरीत सामना जिंकण्यासाठी दोघींमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. त्यामुळे निकाल फेरनिवडीसाठी गेला आणि सर्व पंचानी मिळून लोव्हलिनाला विजेते घोषित केले. यामुळे भारताला जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत चौथे सुवर्णपदक मिळाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -