घरक्रीडाIPL 2023: ...तर सूर्यकुमार यादव असेल मुंबई इंडियन्सचा कर्णधार

IPL 2023: …तर सूर्यकुमार यादव असेल मुंबई इंडियन्सचा कर्णधार

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) 16वे पर्व सुरू होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. असे असतानाच मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यानुसार, यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा बरेच सामने खेळणार नसल्याचे समजते.

इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) 16वे पर्व सुरू होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. असे असतानाच मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यानुसार, यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा बरेच सामने खेळणार नसल्याचे समजते. तसेच, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघाच्या मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव मुंबईचे नेतृत्व करू शकतो, अशी माहिती मिळते. (Ipl 2023 Suryakumar Yadav To Lead Mumbai Indians As Rohit Sharma Likely To Sit Out For Few Matches)

मिळालेल्या माहितीनुसार, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जूनमध्ये होणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक आहे. या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये दुखापतींवीना खेळण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा उत्सुक आहे. त्यामुळे रोहित शर्मा आयपीएलमधील निवडक सामने खेळणार असून उर्वरित सामन्यांमध्ये डग आऊटमधून सूर्यकुमारला मार्गदर्शन करेल.

- Advertisement -

रोहित शर्माला दुखापतींचा मोठा इतिहास आहे, तो आता टीम इंडियाचे महत्त्वाचे सामने गमावण्याच्या मनस्थितीत नाही. तसेच, रोहित शर्मा वर्कलोड मॅनेजमेंटकडे लक्ष देत आहे. दरम्यान, 35 वर्षीय खेळाडूने आधी आग्रह धरला होता की खेळाडूंनी त्यांच्या संबंधित आयपीएल फ्रँचायझींसाठी खेळताना राष्ट्रीय संघाच्या कर्तव्यांसाठी स्वतःला तंदुरुस्त ठेवले पाहिजे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील पराभवानंतर रोहित म्हणाला होता की, हे सर्व आता फ्रँचायझीवर अवलंबून आहे. खेळाडू आता फ्रँचायझी अंतर्गत खेळतील. आम्ही संघांना काही संकेत दिले आहेत, परंतु अंतिम निर्णय फ्रँचायझींवर अवलंबून आहे. महत्त्वाचे म्हणजे ते खेळाडूंवर अवलंबून आहे. ते सर्व समजूतदार आहेत; त्यांना त्याच्या शरीराची काळजी घ्यावी लागते. जर त्यांना वाटत असेल की ते जास्त होत आहे, तर ते याबद्दल बोलू शकतात आणि एक किंवा दोन गेमसाठी ब्रेक घेऊ शकतात.

- Advertisement -

हेही वाचा – आयपीएलनंतर होणार WTCचा अंतिम सामना, बीसीसीआयने दिली आयपीएलच्या संघांना तंबी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -