घरमनोरंजनदीपिका अवतरल्या सीतेच्या रुपात: 37 वर्षानंतर राम नवमीनिमित्त रामायणाच्या आठवणींना उजाळा

दीपिका अवतरल्या सीतेच्या रुपात: 37 वर्षानंतर राम नवमीनिमित्त रामायणाच्या आठवणींना उजाळा

Subscribe

90 च्या दशकात रामानंद सागर यांची हिंदी टेलिव्हिजनवरील ‘रामायण’ मालिका खूप लोकप्रिय ठरली. या मालिकेची तुलना अलीकडच्या रामायणावर आधारित कोणत्याही मालिकेशी होऊ शकत नाही. लॉकडाऊन काळात याचं मालिकेमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन झाले. या मालिकेतील कलाकार आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. अशातच या मालकेत सीतीचे भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनी रामनवमीनिमित्त आपला सीतेच्या वेशातील लूक शेअर केला आहे. नुकताच सोशल मीडियावर त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे जो पाहून अनेकजण त्यांचं कौतुक करत आहेत.

दीपिका चिखलिया यांचा सीता लूक चर्चेत

 

View this post on Instagram

 

A post shared by Dipika (@dipikachikhliatopiwala)

‘रामायण’ मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी नारंगी रंगाची प्लेन साडी नेसली आहे आणि कपाळावर कुंकू लावले आहे. या व्हिडीओमध्ये त्या श्रीरामांची पूजा करताना दिसत आहेत. या व्हिडीओखाली त्यांनी लिहिलंय की, पार्ट 3 फायनल…शेअर केले, ही तीच साडी आहे जी मी लव कुश कांडदरम्यान नेसली होती. त्यांच्या हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

- Advertisement -

नेटकऱ्यांनी केलं कौतुक

दीपिका चिखलिया यांच्या व्हिडीओवर नेटकरी अनेक कमेंट्स करत आहेत. त्यातील एकाने लिहिलंय की, तुमची ही साडी आजही तितकीच सुंदर आहे. तर दुसऱ्याने लिहिलंय की, मॅम सीतेचे स्मरण केल्यास तुमचाच चेहरा डोळ्यासमोर येतो.

 

- Advertisement -

हेही वाचा :

राम नवमीच्या मुहूर्तावर ‘आदिपुरुष’चे नवीन पोस्टर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -