घरपालघरवकील महिलेवर मांत्रिकाचा बलात्कार

वकील महिलेवर मांत्रिकाचा बलात्कार

Subscribe

मांत्रिकाने वकिल महिलेच्या अंगात २१ वर्षीय मुलीचे भूत शिरल्याची बतावणी केली. अंगातून भूत काढण्यासाठी पूजा विधी करण्याचा सल्ला दिला.

वसईः भूत काढण्याच्या बहाण्याने मांत्रिकाने प्रसादात गुंगीचे औषध टाकून एका वकिल महिलेवरच पतीच्या समक्षच बलात्कार केल्याची घटना पालघरमध्ये उजेडात आली आहे. यात पतीचाही सहभाग असल्याची तक्रार पिडीतेने केल्यानंतर याप्रकरणी बोरीवली पोलीस ठाण्यात मांत्रिकाविरोधात बलात्कार आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पालघरमध्ये राहणार्‍या महिला वकिल आणि तिच्या पतीने घरातील अडचणी आणि इतर समस्यांवर उपाय करण्यासाठी एका मांत्रिकाचा सल्ला घेतला होता. मांत्रिकाने वकिल महिलेच्या अंगात २१ वर्षीय मुलीचे भूत शिरल्याची बतावणी केली. अंगातून भूत काढण्यासाठी पूजा विधी करण्याचा सल्ला दिला.

त्यानुसार मांत्रिकाने विधीचे नियोजन केले होते. यावेळी त्याने प्रसादात गुंगीचे औषध टाकून पिडीतेला प्रसाद खावयास दिला होता.प्रसाद खाल्यानंतर अर्धवट बेशुध्दावस्थेत असलेल्या पिडीतेवर मांत्रिकाने बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी स्वतः पती घटनास्थळी हजर होता. पतीच्या संगनमतानेच हा प्रकार घडल्याची माहिती पिडीतेला मिळाल्यानंतर तिने बोरीवली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी मांत्रिक आणि पतीविरोधात बलात्कार आणि अट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -