घरठाणेरोशनी शिंदे गर्भवती नाहीत; तपासानंतर डॉक्टरांचा खुलासा

रोशनी शिंदे गर्भवती नाहीत; तपासानंतर डॉक्टरांचा खुलासा

Subscribe

मारहाणीदरम्यान, रोशनी शिंदे या सहा महिन्यांच्या गर्भवती महिला असल्याचे सांगितले जात होते. परंतु, रुग्णालयात तपासणीनंतर रोशनी शिंदे या गर्भवती नसल्याचे डॉ. उमेश आळेगावकर यांनी स्पष्ट केले.

ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर ठाण्यात शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर रोशनी यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मारहाणीदरम्यान, रोशनी शिंदे या सहा महिन्यांच्या गर्भवती महिला असल्याचे सांगितले जात होते. परंतु, रुग्णालयात तपासणीनंतर रोशनी शिंदे या गर्भवती नसल्याचे डॉ. उमेश आळेगावकर यांनी स्पष्ट केले. (Roshni Shinde is not pregnant Disclosure of doctor after investigation)

नेमके काय म्हणाले डॉक्टर?

- Advertisement -

“काल रात्री १०.३० च्या सुमारास रोशनी शिंदे सिव्हील रुग्णालयातून माझ्या रुग्णालयामध्ये दाखल झाल्या. त्यांना गंभीर मारहाण झालेली नाही. त्यांच्या पाठीवर मुक्या माराच्या हलक्या खुणा आढळल्या आहेत. सोनोग्राफी केली, मात्र कोणतीही अंतर्गत जखम, रक्तस्राव आढळून आला नाही. आम्ही रात्री या महिलेच युरिनरी प्रेग्नन्सी टेस्ट केली. ती निगेटिव्ह आली, त्यानंतर पुन्हा १२ तासांनी युरिनरी प्रेग्नन्सी टेस्ट केली तीही निगेटिव्ह आली. त्यामुळे सध्या तरी ती गर्भवती आहे, असं म्हणता येणार नाही. तिला कोणतेही फ्रॅक्चर नाही, किंवा जखमही झालेली नाही. सध्या या महिलेची प्रकृती स्थिर आहे”, असे डॉक्टर उमेश आळेगावकर यांनी सांगितले.

- Advertisement -

नेमकी घटना काय?

ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडच्या कासरवडवली परिसरात ही घटना घडली. ऑफिसचे काम संपवत घरी जात असताना शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी रोषणी यांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप एफआयआर दाखल केला नसल्याचे समजते. याप्रकरणी वैद्यकिय अहवाल मिळाल्यानंतर तपास सरू करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही दाखवण्यात आले होते. यानंतर रोशनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


हेही वाचा – ठाण्यात ठाकरे गटाच्या महिलेला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण; अद्याप कारवाई नाही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -