घरदेश-विदेशसिक्कीममध्ये हिमस्खलन; सहा पर्यटकांचा मृत्यू, ११ जखमी, ८० जण अडकल्याची भीती

सिक्कीममध्ये हिमस्खलन; सहा पर्यटकांचा मृत्यू, ११ जखमी, ८० जण अडकल्याची भीती

Subscribe

गुवाहाटीः सिक्कीम येथे झालेल्या हिमस्खलनात सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर ११ जण जखमी झाले आहेत. ८० पर्यटक बर्फात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे. ही घटना घडली तो नाथुला परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.

गंगकोट येथली नाथुला परिसरात हे भूस्खलन झाले आहे. जवाहारलाल नेहरु रोडवरील १५ व्या मीलवर हे हिमस्खलन झाले आहे. येथे १५० पर्यटक होते, असा अंदाज आहे. त्यातील सहा जणांचा मृत्यू झाला. ३० पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे. त्यात ११ जखमी आहे. अन्य ८० पर्यटक हिमस्खलनात अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक पोलिसांनी शोध मोहिम सुरु केली आहे.

- Advertisement -

ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. अचानक हिमस्खलन झाल्याने पर्यटकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव सुरु केली. मात्र वेगाने झालेल्या भूस्खलनात पर्यटक अडकले. येथे तत्काळ बचावकार्य सुरु झाले. बर्फात अडकलेल्या सहा जणांना गंगटोकच्या एसटीएनएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार पुरुष, एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. घटनास्थळी सिक्किम पोलीस, सिक्किम travel असोसिएशन, पर्यटन विभागाचे अधिकारी व वाहन चालक बचावकार्य करत आहेत.

चेकपोस्टचे महानिरीक्षक सोनम तेनजिंग भुटिया यांनी सांगितले की, पर्यटकांना १३ वी मीलपर्यंत जाण्याचे पास दिले जातात. तरीही पर्यटक १५ व्या मीलपर्यंत विना परवाना गेले होते. तेथेच ही घटना घडली आहे. बचावकार्य वेगाने सुरु आहे.

- Advertisement -

दरम्यान, जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उत्तराखंड येथील जोशीमठ येथे भूस्खलन झाले होते. जोशीमठ शहरातील भिंतींना व रस्त्यांना तडे गेले होते. सुमारे ५०० घरांना तडे गेल्याची माहिती होती. त्यामुळे येथील नागरिकांना दुसरीकडे स्थलांतरीत केले गेले. त्यावर उपाय म्हणून तेथील राज्य शासनाने धोकादायक घरात राहणाऱ्या नागरिकांना सहा महिन्याचे भाडे देण्याचा निर्णय घेतला. प्रति महिना ४ हजार रुपये येथील नागरिकांना दिले गेले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -