घरमनोरंजनसलमानला लुंगी आणि धोतरातला फरक कळत नाही... 'येंतम्मा' गाणं पाहून माजी क्रिकेटर...

सलमानला लुंगी आणि धोतरातला फरक कळत नाही… ‘येंतम्मा’ गाणं पाहून माजी क्रिकेटर भडकला

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील ‘येंतम्मा’ गाणं प्रदर्शित करण्यात आलं. या गाण्यामध्ये सलमान खान, राम चरण आणि व्यकंटेश पिवळ्या रंगाच्या शर्ट आणि पांढरे धोतर घातले आहे. विशाल ददलानी आणि पायल देवने या गाण्याला आपला आवाज दिला आहे. तर शब्बीर अहमदने या गाण्याचे लेखन केले आहे. . या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र, अशातच माजी क्रिकेटर लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी या गाण्यावर टीका केली आहे.

माजी क्रिकेटरची सलमानच्या गाण्यावर टीका

नुकत्याच काही वेळापूर्वी एका ट्वीटर युजरने या गाण्याची एक व्हिडिओ क्लीप शेअर केली आहे. ज्यात सलमान डान्स करताना दिसत आहे. यावर माजी क्रिकेटर लक्ष्मण शिवरामकृष्णन ट्वीट केलंय की, “हे अत्यंत चुकीचं आहे आणि आपली दक्षिण भारतीय संस्कृतीचा अपमान करत आहे. ही एक लुंगी नाही, हे एक धोतर आहे. एक शास्त्रीय वस्त्र जे एका घाणेरड्या पद्धतीने दाखवलं जात आहे.” यावर अनेक नेटकरी देखील आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

- Advertisement -

एका नेटकऱ्याने लिहिलंय की, “मंदिराच्या परिसरामध्ये चप्पल घालून रेटिंन नाही मिळणार”, यावर लक्ष्मण शिवरामकृष्णनने प्रतिक्रिया देत लिहिलं की, “अलीकडे लोक पैश्यांसाठी काहीही करतात. त्यांना हे ठाऊक नाही का लुंगी आणि धोतरामध्ये काय फरक आहे. चित्रपटाशी संबंधित लोकांना कळायला हवं की, गाण्यात दाखवल्याप्रमाणे मंदिराच्या परिसरात पायात चप्पल घातली जात नाही. मी @CBFC_India ला अपील करतो की याला बॅन करण्याचा विचार करा.”

 

- Advertisement -

हेही वाचा :

अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीचा फोन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -