घरक्राइमतारीख आणि वार सांगून अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

तारीख आणि वार सांगून अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

Subscribe

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला (Salman Khan) पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात सलमानला धमकीचा कॉल आला आहे. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास हा धमकीचा फोन आला होता.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला (Salman Khan) पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात सलमानला धमकीचा कॉल आला आहे. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास हा धमकीचा फोन आला होता. विशेष म्हणजे दुसऱ्यांदा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यामुळे पोलीस सतर्क झाले असून, याप्रकरणी अधिक तपासाला सुरूवात केली आहे. (Bollywood Actor Salman Khan received a death threat call)

मिळालेल्या माहितीनुसार, 30 एप्रिलला सलमान खान याना जीवे मारण्यात येईल अशी धमकी देण्यात आली आहे. धमकी देणारा हा अल्पवयीन मुलगा असून मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) त्याला ताब्यात घेतले आहे. 16 वर्षीय अल्पवयीन मुलाला ठाणे जिल्ह्यातील शाहपूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisement -

अभिनेता सलमान खानला धमकी देणारा मुलगा मुळचा राजस्थानचा आहे. त्याने रॉकी भाई असे स्वत:चे नाव सांगितले आहे. तसेच, गौशालारक्षक असल्याचे सांगितले आहे. सलमान खानला धमकी देणाऱ्याला शहापूर येथे त्याला त्याच्या भावासोबत पकडण्यात आले आहे. या मुलाची प्रकृती स्थिर असून त्याने सलमानला फोन का केला याचा पोलीस तपास करत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबई पोलिसांच्या 112 हेल्पलाईन क्रमांकावर हा धमकीचा फोन आल्याचे समजते. ‘मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे’ असे या धमकीच्या फोनमधून सांगण्यात आले. आरोपीने दारुच्या नशेत फोन केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपासाला सुरूवात केली आहे.


हेही वाचा – मोठी बातमी! पुण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -