घरअर्थजगतGold Price Today: अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोने-चांदी स्वस्त, पाहा आजचे दर काय?

Gold Price Today: अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोने-चांदी स्वस्त, पाहा आजचे दर काय?

Subscribe

तुम्हीही अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

Gold-Silver Price Update: सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अक्षय्य तृतीया 2023 च्या आधी आज म्हणजेच 17 एप्रिल रोजी सोन्या-चांदीच्या किमती घसरल्या आहेत. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या काळात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. तुम्हीही अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज तुम्हाला स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची सुवर्ण संधी आहे. आज सोने-चांदी कोणत्या दराने उपलब्ध आहे ते जाणून घेऊया.

आज देशात 24 कॅरेट सोन्याचा भाव 170 रुपयांनी म्हणजेच 0.28% च्या घसरणीसह 60,710 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 55,610 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. 13 एप्रिल रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,880 रुपये प्रति 10 ग्रॅम होता आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 55,770 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता.
दुसरीकडे, चांदीबद्दल बोलायचे झाले तर, आज चांदीही स्वस्त झाली आहे. आज चांदीची किंमत 0.40% कमी झाली आहे, म्हणजे 300 रुपये प्रति किलोग्रॅम 75,600 रुपये इतकी किंमत चांदीची झाली आहे.

- Advertisement -

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

तुमच्या शहरातील सोन्याचे आजचे भाव-

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 55,940 रुपये
पुणे – 55,940 रुपये
नागपूर – 55,940 रुपये

- Advertisement -

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 61,030 रुपये
पुणे – 61,030 रुपये
नागपूर – 61,030 रुपये

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात (Gold Price Today) पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -