घरमनोरंजनवरुण - श्रद्धा 'एबीसीडी २' नंतर पुन्हा एकत्र

वरुण – श्रद्धा ‘एबीसीडी २’ नंतर पुन्हा एकत्र

Subscribe

‘एबीसीडी २’ या चित्रपटाइतकीच चित्रपटातील वरुण धवन आणि श्रद्धा कपूरच्या जोडीनेही प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर या जोडीला मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र पाहण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली होती. दरम्यान, आता नुकतीच याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली असून वरुण आणि श्रद्धा लवकरच एकत्र काम करणार आहेत. या जोडीचा नवीन चित्रपटही ‘एबीसीडी २’ प्रमाणेच डान्सवर आधारित असणार आहे. रेमो डिसूझा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्याचं समजतंय. सूत्रांनुसार, येत्या २२ जानेवारीपासून पंजाबमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. भूषण कुमार यांची निर्मीती असलेल्या या चित्रपटाचं नाव मात्र अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. चित्रपट समीक्षक आणि विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्वीटरवरुन याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.

 

- Advertisement -


२०१५ साली आलेल्या ‘एबीसीडी २’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही रेमो डिसूझानेच केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ यश कमावलं होतं. त्यासोबतच चित्रपटातील कलाकारांनी आणि गाण्यांनी लोकांची मनं जिंकली होती. वरुण धवन आणि श्रद्धा कपूरच्या जोडीलाही लोकांची पसंती मिळाली होती. त्यामुळे याच जोडीचा हा आगामी चित्रपट कसा असणार? त्यामध्ये काय नवीन असणार? बॉक्स ऑफिस आणि प्रेक्षकांच्या पसंतीला तो उतरणार का? आणि मुख्य म्हणजे या चित्रपटाचं नाव काय असणार… हे सगळं जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे.


पाहा : रणवीर-आलियाचा रोमँटिक अंदाज व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -