घरमनोरंजनसलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’चा धुरळा; लवकरच करणार 100 कोटी...

सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’चा धुरळा; लवकरच करणार 100 कोटी पार

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच जबरदस्त कमाई करण्यास सुरुवात केली आहे.

या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.81 कोटींची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी 25.75 कोटींची कमाई केली होती. तसेच तिसऱ्या दिवशी 25-27 कोटींची कमाई केली आहे. तसेच सोमवारी म्हणजेच चौथ्या दिवशी चित्रपटाने 10.50 कोटी कमावले आहेत. अवघ्या चार दिवसात या चित्रपटाने एकूण 75 कोटींचा टप्पा सहज पार केला आहे. त्यामुळे आगामी काळात हा चित्रपट लवकरच 100 कोटीचा टप्पा पार करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

- Advertisement -

फरहाद सामजी दिग्दर्शित ‘किसी का भाई किसी की जान’ ची कथा स्पर्श क्षेत्रपाल यांनी लिहिली आहे. टीझरपासून ते रिलीज झालेल्या गाण्यांपर्यंत आणि ट्रेलरपर्यंत लोकांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. सलमानचे चाहते मोठ्या संख्येने चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक होते. सलमान खान चित्रपट निर्मिती, किसी का भाई किसी की जान फरहाद सामजी दिग्दर्शित आहे. या चित्रपटात सलमान खान, व्यंकटेश दग्गुबती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत.

जगभरात 5700 स्क्रीनवर प्रदर्शित

‘किसी का भाई किसी की जान’ 100 हून अधिक देशांमध्ये 1200 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. त्याचवेळी, हा चित्रपट जगभरात 5700 स्क्रीनवर प्रदर्शित झाला. मोठ्या प्रमाणात रिलीज होऊनही, चित्रपटाचे ओपनिंग डे कलेक्शन अपेक्षेपेक्षा थोडे कमी होते. या चित्रपटाने जगभरात 30 कोटींची कमाई केली आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

68 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स सोहळ्यात आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ ला अनेक नामांकने

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -