घरमनोरंजनअरिजीत सिंहच्या दर्दभऱ्या आवाजामागचे 'हे' आहे कारण

अरिजीत सिंहच्या दर्दभऱ्या आवाजामागचे ‘हे’ आहे कारण

Subscribe

बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक अरिजीत सिंहच्या आवाजाचे लाखो चाहते आहेत. अरिजीत सिंहने आत्तापर्यंत जवळपास बॉलिवूडमध्ये 221 गाणी गायली आहेत. आज अरिजीतचा 35 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे अनेक चाहते आणि कलाकार त्याला शुभेच्छा देत आहेत. अरिजीत सिंहचा जन्म 25 एप्रिल 1987 रोजी पश्चिम बंगालमधील  मुर्शिदाबाद येथे झाला. त्यांच्या कुटुंबाचे संगीताशी खूप जुने नाते आहे, त्यांना गायक बनण्याची प्रेरणा घरातूनच मिळाली.

रिअ‍ॅलिटी  शोमधून झाली करिअरची सुरुवात

अरिजित सिंगने आपल्या गाण्याच्या कारकिर्दीला गुरुकुल आणि इंडियन आयडॉल या रिअॅलिटी शोमधून सुरुवात केली. नंतर संजय लीला भन्साळी यांनी त्यांना चित्रपटात गाण्याची संधी दिली. ‘सावरिया’ या चित्रपटात अरिजीतने त्याच्या कारकिर्दीतील पहिले गाणे गायले. त्यानंतर हळूहळू अरिजीतच्या दर्दी आवाजाला पसंती मिळू लागली. आशिकी 2 मधील गाण्यांनी अरिजीत सिंहला रातोरात स्टार बनवलं.

अरिजीतच्या दर्दभऱ्या आवाजामागे दडलंय त्याचं वैयक्तिक आयुष्य

 

View this post on Instagram

 

A post shared by Spotify India (@spotifyindia)

- Advertisement -

सध्या अरिजीतला बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि दर्दी आवाजाचा गायक म्हटलं जातं. त्याच्या या दर्दभऱ्या आवाजामागे त्याचं वैयक्तिक आयुष्य दडलेल्याचं खूप कमी लोकांना माहित आहे. 2013 मध्ये अरिजीतने गुरुकुल या रिअॅलिटी शोमधील सह-स्पर्धक रुपरेखाच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी लग्न केलं. मात्र, वर्षभरात त्यांच्या घटस्फोट झाला. त्यानंतर अरिजीतने 2014 मध्ये बालपणीची मैत्रिण कोयलशी लग्न केले. कोयल देखील त्यावेळी घटस्फोटीत होती. कोयलला त्यावेळी पहिल्या पतीपासून एक मूल होते.


हेही वाचा :

सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’चा धुरळा; लवकरच करणार 100 कोटी पार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -