घरनवी मुंबईशिवशाही बसच्या अपघातात एकाचा मृत्यू; २२ जण जखमी

शिवशाही बसच्या अपघातात एकाचा मृत्यू; २२ जण जखमी

Subscribe

मुंबई-गोवा महामार्गवर कर्नाळा खिंडीतील तारा गावा जवळ दुपारच्या सुमारास झालेल्या शिवशाही बसच्या अपघातात एकाचा मृत्यू तर २२ प्रवासी जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. पनवेलहून महाडच्या दिशेने शिवशाही बस (एमएच०९/इएम९२८२) ही निघाली होती. दरम्यान कर्नाळा खिंडीतील तलावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस पटली झाली. या बसमधून ३८ प्रवासी आणि चालक व वाहक असे एकूण ४० जण प्रवास करत होते

पनवेल:  मुंबई-गोवा महामार्गवर कर्नाळा खिंडीतील तारा गावा जवळ दुपारच्या सुमारास झालेल्या शिवशाही बसच्या अपघातात एकाचा मृत्यू तर २२ प्रवासी जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. पनवेलहून महाडच्या दिशेने शिवशाही बस (एमएच०९/इएम९२८२) ही निघाली होती. दरम्यान कर्नाळा खिंडीतील तलावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस पटली झाली. या बसमधून ३८ प्रवासी आणि चालक व वाहक असे एकूण ४० जण प्रवास करत होते. या अपघातात एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २२ प्रवासी जखमी झाले आहेत.या अपघाताची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पथक तसेच पळस्पे वाहतुक शाखेच्या वरिष्ट पोलिस निरीक्षक स्मिता जाधव व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी मदत कार्य सुरु केले. यावेळी अपघातातील जखमींना रुग्णवाहिकेमधून पनवेल उपजिल्हा रुग्णालय तसेच कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान याच मार्गावर एका रेनॉल्ट्स कंपनीच्या कारचाही अपघात झाला होता. त्यामुळे या मार्गावर काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती.

पत्रकार संतोष चौकर जखमी
या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये दैनिक ‘आपलं महानगर’चे श्रीवर्धनचे प्रतिनिधी संतोष चौकर यांचाही समावेश असून त्यांच्या डोक्याला मार लागल्याने सहा टाके घालावे लागले. किरकोळ जखमी प्रवाशांवर उपचार करुन त्यांना घरी पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -