घरक्राइमराष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांविरोधात अश्लील ट्वीट करणाऱ्यावर गुन्हा दाखल

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांविरोधात अश्लील ट्वीट करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Subscribe

ट्विटरवर @अक्षय नावाच्या एका ट्विटर हँडलरवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अश्लील शिविगाळ करणारी पोस्ट शेअर करण्यात आली होती.

ठाणे (प्रतिनिधी) : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अश्लील ट्वीट करण्यात आले होते. हे अश्लील ट्वीट करणाऱ्या इसमाविरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. (A case has been registered against who posted obscene tweets NCP leader Jitendra Awhad vvp96)

नेमकं प्रकरण काय?

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटरवर @अक्षय नावाच्या एका ट्विटर हँडलरवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अश्लील शिविगाळ करणारी पोस्ट शेअर करण्यात आली होती. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे उथळसर ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे आणि सोशल मीडियाचे प्रमुख जतीन कोठारी यांनी राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

- Advertisement -

समीर पेंढारे आणि जतीन कोठारी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांची भेट घेऊन रितसर फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार पोलिसांनी भादंवि 297 आणि माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम 2008 च्या कलम 67 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास राबोडी पोलीस करीत आहेत.

आम्ही कायदा हातात घ्यायचा का? – आव्हाड

दरम्यान, @अक्षय नावाच्या ट्विटरवरून अश्लील ट्वीट केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी हे ट्वीट रीट्वीट करत आम्ही कायदा हातात घ्यायचा का? असा सवास उपस्थित केला. तसेच, “हे असले ट्रॉलर्स, ही ह्यांची संस्कृति, हे ह्यांचे संस्कार मारले की आम्ही गुन्हेगार आमची आई आम्ही देवा समान सांगा @DGPMaharashtra @ThaneCityPolice आम्ही कायदा हातात घ्यायचा का… कारण सत्ताधारी सांगतात तेव्हा लगेच कारवाई होते”, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.


हेही वाचा – आता ते कुठे गायब झाले? चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना मिश्किल टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -