घरताज्या घडामोडीआता ते कुठे गायब झाले? चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना मिश्किल टोला

आता ते कुठे गायब झाले? चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना मिश्किल टोला

Subscribe

मागील अनेक महिन्यांपासून पुणेकरांना पाणीसंकटाचा सामना करावा लागत आहे. वेळेवर आणि पूरक पाणी मिळत नसल्याने वारंवार आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पुणेकरांना दिलासा देण्यासाठी आणि पाणीकपातीवर चर्चा करण्यासाठी कालवा समितीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित झाले.

मागील अनेक महिन्यांपासून पुणेकरांना पाणीसंकटाचा सामना करावा लागत आहे. वेळेवर आणि पूरक पाणी मिळत नसल्याने वारंवार आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पुणेकरांना दिलासा देण्यासाठी आणि पाणीकपातीवर चर्चा करण्यासाठी कालवा समितीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित झाले. पण अजित पवारांनी या बैठकीला दांडी मारली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना मिश्किल टोला लगावला. मी अजितदादांसाठी धावत पळत आलोय ते कुठे गायब झाले? अशा शब्दांच चंद्रकांत पाटलांनी टोला लगावला. (bjp leader chandraknat patil taunts ncp ajit pawar over not attending meeting at pune maharashtra)

पुण्यातील शासकीय विश्रामगृह येथे आज विरोधी पक्षनेते अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कालवा समितीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पालकमंत्री आणि भाजपा नेते चंद्रकांत पाटील नियोजित वेळेपेक्षा उशिरा आले. परंतु, बैठक स्थळी दाखल झाल्यानंतर गाडीतून उतरताच चंद्रकांत पाटलांनी “अजितदादा आलेत का? दादांसाठी मी धावत पळत आलो आहे, आज ते कुठे गायब झाले..?” , असे म्हणत अजित पवारांना टोला लगावला.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या प्रत्येक वक्तव्याची किंवा हालचालीची बातमी होत आहे. अजित पवार हे लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. परंतु, ‘मी जीवातजीव असेपर्यंत राष्ट्रवादी सोडणार नाही’, असे अजित पवारांनी स्पष्टीकरण देऊनही चर्चा थांबायचं काही नाव घेत नाही. त्यातच भाजपच्या नेत्यांकडून अजित पवारांबद्दल अधिक संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यापैकीच आत्ताच चंद्रकांतदादाचे हे वक्तव्य म्हणता येईल.

दरम्यान, आजच्या बैठकीत पुण्यावरची पाणीकपात तूर्तास टळली आहे. पुणेकरांची पाणीकपात १५ मे पर्यंत टळली असून १५ मे नंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. कालवा समिती बैठकीत पाणी नियोजनावर चर्चा झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत पुण्याच्या पाणी प्रश्नावर मोठा निर्णय झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात 11 जवान शहीद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -