घरक्रीडाIPL 2023 : दिल्लीच्या 'या' खेळाडूचे महिलेशी अश्लील वर्तन; संघव्यवस्थापनेकडून नियमांत बदल

IPL 2023 : दिल्लीच्या ‘या’ खेळाडूचे महिलेशी अश्लील वर्तन; संघव्यवस्थापनेकडून नियमांत बदल

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) दिल्ली कॅपिटल्स संघातील एका खेळाडूने महिलेशी अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यानंतर आयोजित एका पार्टीत या खेळाडूने महिलेसोबत अश्लील वर्तन केले.

इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) दिल्ली कॅपिटल्स संघातील एका खेळाडूने महिलेशी अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यानंतर आयोजित एका पार्टीत या खेळाडूने महिलेसोबत अश्लील वर्तन केले. या खेळाडूचे नाव अद्याप समजलेले नाही. मात्र या घटनेनंतर दिल्लीच्या संघ व्यवस्थापन गंभीर झाले आहे. (franchise introduced code of conduct 2023 ipl 2023 delhi capitals player misbehaved with women at private party)

दिल्ली कॅपिटल्स संघातली खेळाडूकडून झालेल्या या प्रकारानंतर संघाच्या प्रतिमेचा विचार करता खेळाडूंसाठी कठोर नियम लावण्यात आले आहेत. यामध्ये दिल्लीच्या खेळाडूंना रात्री दहानंतर बाहेर जाता येणार नाही. त्याशिवाय भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला परवानगी घ्यावी लागेल. नियमाचे उल्लंघन केले तर दंड केला जाईल. प्रकरण जर गंभीर असेल तर खेळाडूचा करार देखील रद्द केला जाऊ शकतो.

- Advertisement -

दिल्ली कॅपिटल्स संघाच्या अडचणी कमी व्हायचे नाव घेत नाहीत. आयपीएल सुरु होण्याआधी ऋषभ पंत दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर संघाला एकापाठोपाठ एक पराभाचा सामना करावा लागला. तळाशी असलेल्या दिल्ली संघाला टीकेचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, या घटनेनंतर केलेल्या बदलांनुसार, आता या घटनेनंतर दिल्ली फ्रेंचायजीने नवीन निर्बंध घातले आहेत. खेळाडूंच्या रुमममध्ये प्रवेश करण्यासाठी पाहुण्यांना परवानगी घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय रात्री 10 वाजल्यानंतर कुठल्याही पाहुण्याला परवानगी मिळणार नाही, हे दिल्ली फ्रेंचायजीने स्पष्ट केले.

डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्ली संघाची कामगिरी सर्वसामान्य राहिली आहे. दिल्लीला आतापर्यंत पाच पराभवाचा सामना करावा लागलाय. दिल्लीचा संघ गुणतालिकेत दहाव्या स्थानवर आहे. पाच पराभवानंतर दिल्लीने दोन विजय मिळवले आहेत. कोलकाता आणि सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवत दिल्लीने चार गुणांची कमाई केली.

- Advertisement -

काय आहेत नियम?

  • रात्री 10 वाजल्यानंतर दिल्लीचे खेळाडू कुणालाही हॉटेलच्या रुममध्ये घेऊन जाऊ शकत नाहीत.
  • जर कुणाला भेटायचे असेल तर हॉटेलच्या कॉफी शॉपमध्ये अथवा लॉबीमध्ये भेटावे लागेल.
  • जर एखाद्या खेळाडूला हॉटेलसोडून जायचे असेल तर संघ व्यवस्थापकाची परवानगी घ्यावी लागेल.
  • एमर्जन्सी बाहेर जायचेच असेल तर इंटिग्रिटी ऑफिसरला कल्पना द्यावी लागणार आहे.
  • संघ व्यवस्थापनाला एक ओळखपत्र देखील द्यावे लागले.
  • जर खेळाडूंनी या नियमाचे उल्लंघन केले तर दंड आकारला जाईल.
  • जर प्रकरण अधीक गंभीर असेल तर करार रद्द केला जाऊ शकते.

हेही वाचा – BCCI महिला क्रिकेटच्या वार्षिक कराराची घोषणा, 5 खेळाडूंना वगळले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -