घरदेश-विदेशVande Bharat Express Accident: वंदे भारत एक्स्प्रेसला पुन्हा अपघात; गायीला धडक

Vande Bharat Express Accident: वंदे भारत एक्स्प्रेसला पुन्हा अपघात; गायीला धडक

Subscribe

देशातील पहिली सेमी-हाय स्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेसला पुन्हा एकदा अपघात झाला आहे. दिल्लीहून भोपाळला परतणाऱ्या ट्रेनला ग्वाल्हेरमध्ये अपघात झाला. ट्रेनसमोर गाय आल्याने हा अपघात झाला. ही घटना संध्याकाळी 6.15 च्या सुमारास घडली. गायीच्या धडकेमुळे गाडीचे बोनेट उघडून समोरच्या भागाचे नुकसान झाले आहे.

देशातील पहिली सेमी-हाय स्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेसला पुन्हा एकदा अपघात झाला आहे. दिल्लीहून भोपाळला परतणाऱ्या ट्रेनला ग्वाल्हेरमध्ये अपघात झाला. ट्रेनसमोर गाय आल्याने हा अपघात झाला. ही घटना संध्याकाळी 6.15 च्या सुमारास घडली. गायीच्या धडकेमुळे गाडीचे बोनेट उघडून समोरच्या भागाचे नुकसान झाले आहे.  ( Vande Bharat Express Accident Another accident to Vande Bharat Express Hit the cow )

अपघातानंतर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ग्वाल्हेरच्या डबरा स्टेशनवर सुमारे 15 मिनिटे उभी होती. त्याचवेळी वंदे भारत एक्स्प्रेस पाहण्यासाठी आजूबाजूला लोकांची गर्दी झाली. रेल्वेच्या तांत्रिक कर्मचार्‍यांनी स्टेशनवरच बोनेट दुरुस्त केला. त्यानंतर ट्रेन रवाना झाली. वंदे भारत ट्रेनला अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही वंदे भारत एक्सप्रेसला अनेकदा अपघात झाले आहेत.

- Advertisement -

१ एप्रिललाच या मार्गावर वंदे भारतला हिरवा झेंडा

1 एप्रिल 2023 लाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ ते मध्य प्रदेश या पहिल्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. ही गाडी सुरू होऊन महिनाही झाला नाही तोच अपघात झाला आहे. वंदे भारत एक्स्प्रेसने भोपाळच्या राणी कमलापती स्थानकापासून नवी दिल्ली स्थानकापर्यंत प्रवास करण्यासाठी 7 तास 50 मिनिटे लागतील.

( हेही वाचा: Wrestlers Protest: कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ नीरज चोप्रासह कपिल देवही मैदानात )

- Advertisement -

वंदे भारत ट्रेनने गुरे आदळल्याच्या घटनांमुळे रेल्वे प्रशासन चिंतेत आहे. त्यांना रोखण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय रेल्वे सध्या आधुनिकतेवर भर देत आहे. रेल्वे स्थानकांची सुधारणा केली जात आहे. नवीन हायस्पीड गाड्या सुरू केल्या जात आहेत. या मालिकेत सरकारने भविष्यात भारतभर ४०० वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे सुमारे 1600 डबे तयार केले जातील, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते. यापैकी प्रत्येकी आठ कोटी ते नऊ कोटी रुपये खर्च येणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, नवीन वंदे भारत गाड्या जास्तीत जास्त 200 kmph (kmph) वेग गाठू शकतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -