घरमहाराष्ट्रदेश एकसंघ ठेवण्यासाठी मेहनत करावी लागेल; ईदच्या कार्यक्रमात शरद पवारांचे आवाहन

देश एकसंघ ठेवण्यासाठी मेहनत करावी लागेल; ईदच्या कार्यक्रमात शरद पवारांचे आवाहन

Subscribe

नवी दिल्लीः देशात सध्या वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विशिष्ट समुदाय चिंतेत आहे. पण एखादी समस्या निर्माण झाली की अहिंसा आणि मानवता आपल्याला सशक्त करावी लागते. तो सशक्तपणाच आपल्याला यश मिळवून देतो. देश एकसंघ ठेवण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

ईद निमित्त दिल्ली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शरद पवार यांनी हे आवाहन केले. शरद पवार म्हणाले, आपण सर्व एक आहोत याचा संदेश देण्यासाठी दिल्लीत ईदचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जेणेकरुन सर्वांना कळेल की आपल्यात काहीच मतभेद नाही. भारतात सध्या वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. याने विशिष्ट समुदाय चिंतेत आहे. समस्या निर्माण झाली की त्याला समोरे जाण्यासाठी मेहनत करावी लागते. अहिंसा आणि मानवता हे आपल्याला सशक्त करावे लागतील. देश एकसंघ ठेवण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागले.

- Advertisement -

जरी आपल्या राजकीय भूमिका वेगळ्या असतील. आपली जात, धर्म वेगळे असले तरी देशाला एकसंघ ठेवण्यासाठी. प्रगती करण्यासाठी आपण एकत्र राहू. एकत्र काम करु. आपल्यात मतभेद राहणार नाहीत याची काळजी घेऊ, असेही शरद पवार यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्रात सध्या सत्ता बदलाचे वारे वाहत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अपात्र ठरतील. शिंदे-फडणवीस सरकार पडणार, अजित पवार भाजपसोबत जाणार, असे अनेक तर्कविर्तक लढवले जात आहेत. त्यातच शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याची वेळ असल्याचे वक्तव्य एका भाषणात केले. आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे. एवढचं नाही तर पक्षात याबाबत विलंब करुन चालणार नाही. पक्षातील लोकांना तसं सांगावं लागणार, असं शरद पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने मात्र राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यात आता मुस्लिम सुमदायाला दिलासा देणारे वक्तव्य शरद पवा यांनी शुक्रवारी केले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -