घररायगडपोलादपूरात ई लर्निंगसह शैक्षणिक ब्लॉग सुविधा

पोलादपूरात ई लर्निंगसह शैक्षणिक ब्लॉग सुविधा

Subscribe

अति डोंगराळ असलेल्या पोलादपूर तालुक्यात प्रभारी गटशिक्षण अधिकारी सुभाष साळुंके यांच्या माध्यमातून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत ई लर्निंग आणि शैक्षणिक ब्लॉगची सुविधा जिल्हा सुरु करण्यात आली आहे. प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी पुनिता गुरव तसेच सहकार्य करणार्‍या कंपनी आणि एनीओ संस्थाचे आधिकारी यावेळी उपस्थित होते. ही बाब समाधानाची असली तरी आधीचा अनुभव आणि वस्तुस्थिती पाहता या सुविधांचा लाभ किती शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार?, अशी शंका पालकांकडून व्यक्त होत आहे.

पोलादपूर: अति डोंगराळ असलेल्या पोलादपूर तालुक्यात प्रभारी गटशिक्षण अधिकारी सुभाष साळुंके यांच्या माध्यमातून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत ई लर्निंग आणि शैक्षणिक ब्लॉगची सुविधा जिल्हा सुरु करण्यात आली आहे. प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी पुनिता गुरव तसेच सहकार्य करणार्‍या कंपनी आणि एनीओ संस्थाचे आधिकारी यावेळी उपस्थित होते. ही बाब समाधानाची असली तरी आधीचा अनुभव आणि वस्तुस्थिती पाहता या सुविधांचा लाभ किती शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार?, अशी शंका पालकांकडून व्यक्त होत आहे.
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील एकूण १४४ प्राथमिक मराठी शाळांपैकी ३७ शाळा डिजीटल शाळा असून यातील अनेक शाळांमधील संगणक, प्रोजेक्टर आणि उपकरणे बंद पडलीआहेत तर काही अन्य कारणांमुळे धूळ खात आहेत. त्यामुळे ‘पुढचे पाठ आणि मागचे सपाट’ या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांची तर ‘नाव मोठं लक्षण खोटं’ अशी शाळांची गत झाली आहे. त्यामुळे डिजिटल शिक्षण प्रणालीचा पुरता बोजवारा उडाला आहे. अशा निराशाजनक शैक्षणिक परिस्थितीतआता इ लर्निंग पद्घतीच्या शिक्षण प्रणालीचा गट शिक्षणाधिकारी यांनी घाट घातला असल्याची चर्चा आहे.
यापूर्वी शासनाकडून विद्यार्थ्याना दर्जेदार आणि गुणवत्ता वाढीसाठी काही शाळांना टीव्ही संच देण्यात आले होते.
त्याद्वारे प्रसारित होणार्‍या शैक्षणिक कार्यक्रमातून काही विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत होते, मात्र कोरोना काळात टिव्ही संच नादुरूस्त झाले आणि दूरशिक्षणाचा खेळखंडोबा झाला तसेच आठदहा शाळांमधील विद्यार्थ्यांना टॅब
देण्यात आले होते. त्यामुळे टॅबचा रिचार्ज करण्यासाठी विद्यार्थ्याना भुर्दंड पडत असल्याने आजच्या स्थितीत टॅबचा लाभ विद्यार्थी घेतात काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
काही शाळांमध्ये लॅपटॉप असून काही शाळा सौर उर्जाचा वापर करणार्‍या आहेत. या शाळांमधील लॅपटॉप आणि सौर उर्जेचे प्रकल्प सुस्थितीत नाहीत अशी माहिती प्राप्त झाली आहे अशी एकूण शाळांची विकारक स्थिती आहे
काही विद्यार्थ्यांचे पालक आपला स्मार्टफोन आपल्या पाल्याला शिक्षणाचे घडे गिरवण्या साठी देत असतात, पण त्या विद्यार्थाला नेट मिळ्ण्यासाठी घराबाहेर रानोमाळ नेटचा शोध घेत अनेक किलोमीटरचे अंतर फिरावे लागत आहे. तालुक्यातील विद्यार्थ्याच्या गुणवत्तावाढीसाठी गट शिक्षण विभाग असे विविध उपक्रम राबवित आहे, असे सांगण्यात येते त्यानुसारशासनाकडून विद्यार्थ्यासाठी शिष्यवृती परिक्षा घेतली जाते. या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला शिक्षणाकरीता अनुदान दिले जाते तर केंद्र सरकारच्या माध्यमातून जवाहर नेहरू नवोदय विद्यालयाची प्रवेश परिक्षा घेतली जातअसते या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला बारावीपर्यंतचे मोफत शिक्षण घेण्याची संधी मिळते.

गट शिक्षणाधिकारी यांनी पुढाकार घेण्याची गरज
तालुक्यातील विविध विषयतज्ञांचे पाठ लाईव्ह घेतले जाणार असून संगणक, युट्युबद्वारा, स्मार्ट टीव्ही,व्हीडीओ अपलोड करुन , पेन ड्राईव्हद्वारा शिक्षकांमार्फत पोहोच वले जाणार आहे . मुळात शाळांमध्ये हे शिकण्यासाठी
लागणार्‍या साहित्याची बोंबाबोंब आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना लाभ कसा मिळणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. जून महिन्याच्या १५ तारखेला शाळा सुरू झाल्यावर येथील विद्यार्थ्याने आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शिक्षणाचा लाभ मिळण्यासाठी गट शिक्षणाधिकारी यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. महत्वाचे
ग्रामीण भागातील ८० टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाहीत. त्यामुळे पोलादपूरात ई लर्निंगसह शैक्षणिक ब्लॉग सुविधा देण्याची भूमिका आणि योजना चांगली असली तरी दुर्गम भागातील शाळांना लाभ मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -