घरताज्या घडामोडीमुक्तछंदाचे प्रवर्तक कवी अनिल

मुक्तछंदाचे प्रवर्तक कवी अनिल

Subscribe

प्रसिद्ध कवी आत्माराम रावजी देशपांडे उर्फ अनिल यांचा आज स्मृतिदिन. कवी अनिल यांचे मराठी कवितेच्या वाटचालीप्रमाणेच अपारंपरिक शिक्षणक्षेत्रातही भरीव योगदान आहे. त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1901 रोजी विदर्भातील मूर्तिजापूर येथे झाला. शालेय शिक्षण अमरावती येथील हिंदू हायस्कूलमधून झाले. ते 1919 साली पुण्यात आले. ते तत्त्वज्ञान हा विषय घेऊन पुण्याहून बीए (1924) झाले. पुढे, त्यांनी कायदे शिक्षणाचे धडे घेतले. ते एलएलबी 1925 साली झाले आणि त्यांनी अमरावतीला वकिली सुरू केली. त्यातूनच त्यांना होशंगाबाद (मध्य प्रदेश) येथे न्यायाधीश म्हणून नियुक्ती मिळाली. अनिल यांच्या आवडीचे विषय पुरातत्त्व, शिल्प, संगीत आणि तत्त्वज्ञान हे होते.

अनिल यांच्या काव्यलेखनास 1930 साली प्रारंभ झाला. त्यांचा ‘फुलवात’ हा पहिला कवितासंग्रह 1932 साली प्रसिद्ध झाला. ‘फुलवात’ने मराठी साहित्यविश्वाचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर तीन वर्षांनी अनिल यांची ‘प्रेम आणि जीवन’ ही कविता रसिकांपुढे आली.

- Advertisement -

अनिल यांनी मालवण येथे झालेल्या ‘मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद 1958 साली भूषवले होते. त्यांनी कवितेत रचनेच्या अंगानेही प्रयोग केले. ते ‘दशपदी’ आणि ‘मुक्तछंद’ या काव्यप्रकारांचे प्रवर्तक होते. त्यांची कविता मुक्तछंदात असली तरी कवितेचे व्याकरण आणि तालाचे भान त्यांनी सोडले नाही. त्यांच्या ‘दशपदी’त दहा चरणांची कविता असे. त्यांना ‘दशपदी’साठी ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार 1977 साली मिळाला होता. अनिल यांना 1979 ची ‘साहित्य अकादमी’ची फेलोशिप प्रदान करण्यात आली होती. अनिल आणि कुसुमावती या सुविद्य दाम्पत्याच्या पत्रव्यवहाराचा संग्रह (कुसुमानिल) प्रसिद्ध आहे. अशा या महान कवीचे 8 मे 1982 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -