घरमनोरंजनमराठीत पहिल्यांदाच 'क्लॉथलेस' हिरो, पोस्टर रिलीज

मराठीत पहिल्यांदाच ‘क्लॉथलेस’ हिरो, पोस्टर रिलीज

Subscribe

कपडे नसलेला हिरो चित्रपटाच्या पोस्टरवर झळकणं असा प्रयोग मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पहिल्यांदाच होत आहे.

दुनियादारी, तू हिरे, प्यार वाली लव्ह स्टोरी आणि अलिकडेच आलेला ये रे ये रे पैसा असे एकाहून एक दर्जेदार मराठी चित्रपट बनवणारे निर्माते संजय जाधव, लवकरच एक नवा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘लकी’ असं या आगामी चित्रपटाचं नाव असून, नुकतंच चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं आहे. सध्या हे पोस्टर सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे आणि सोबतच पोस्टरवरील ‘विवस्त्र हिरोची’ही चर्चा होते आहे. ‘लकी’ चित्रपटाच्या पोस्टरवरील अभिनेता अभय महाजन विवस्त्र अर्थात कपडे न घातलेल्या आणि कमरेला ट्यूब लावलेल्या अवस्थेत, रस्त्यावरुन धावताना दिसत आहे. मराठी चित्रपटांच्या इतिहासात पोस्टरवर पहिल्यांदाच असा ‘क्लॉथलेस’ हिरो झळकल्यामुळे, त्याची विशेष चर्चा होते आहे. बी लाइव्ह प्रोडक्शन्सचे सुरज सिंग यांनी ‘लकी’ चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. सुरज यांनी एम एस धोनी आणि फ्लाइंग जाट या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

मराठीत पहिल्यांदाच ‘असं’ पोस्टर

कपडे नसलेला हिरो पोस्टरवर झळकणं असा प्रयोग पहिल्यांदाच मराठीत होत आहे. याविषयी बोलताना ‘लकी’चे निर्माते सुरज सिंग म्हणाले, ‘मराठी तरूण आणि मराठी चित्रपट कात टाकत आहे. लकी हा चित्रपटही आजच्या तरूण पिढीवर आधारित असल्यामुळे, चित्रपट पाहताना तुम्हाला अनेक आश्चर्यकारक धक्के बसणार आहेत. काहीतरी हटके पण कथेला आणि नायकला साजेसं असं हे खास पोस्टर्स सर्वांना नक्कीच आकर्षित करेल याची खात्री आहे.’ संजय जाधव मराठी सिनेसृष्टीत निखळ मनोरंजनासाठी ओळखले जातात. त्यामुळे आमचा हा चित्रपट तशाच धाटणीचा आणि प्रेक्षकांचा फूल टू मनोरंजन करणारा असल्याचं, सुरज सिंग सांगतात.

- Advertisement -

लकी चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक संजय जाधव सांगतात की, आजच्या तरूणाईची गोष्ट आहे. आजचे तरूण बिनधास्त आणि स्वच्छंदी आहेत. लकी चित्रपटात तुम्हाला आजच्या तरुणांची भाषा, त्यांचा स्वभाव, त्यांचे नवे विचार आणि त्यांचा बिनधास्तपणा अनुभवायला मिळेल. चित्रपटाचं पोस्टरही आजच्या तरुणांसारखंच बिनधास्त आणि ‘ओपन’ आहे. लकी चित्रपट तरुणांसोबतच अन्य पिढीतील लोकांचंही मनोरंजन करेल याची मला खात्री आहे.

‘लकी’ चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन यांच्या मुख्य भूमिका आहेत. येत्या ७ फेब्रुवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. आता संजय जाधवांचा सिनेमा आहे म्हटल्यावर काहीतरी हटके असणार हे नक्की.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -