घरमहाराष्ट्रनाना पटोले यांच्यातील वादावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया; म्हणाले...

नाना पटोले यांच्यातील वादावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Subscribe

मुंबई | नाना पटोले आणि माझ्यातील वाद आता संपला असून आम्ही आमच्यातील वादावर पडदा टाकला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील चवाट्यावर आला. प्रत्येक वेळी दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत होते. परंतु, विजय वडेट्टीवारांनी दोघांमधील वाद संपल्याचे सांगितले.

विजय वडेट्टीवार म्हणाले, “काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माझ्यातील वाद आता संपला असून त्यांना काय वाटते किंवा मी काय म्हटले हा अंतर्गत विषय होता. आम्ही अंतर्गत विषयावर पडदा टाकलेला असून यापुढे कुठलाही विषय शिल्लक राहिलेला नाही. हा विषय दिल्लीपर्यंत नेहणार नाही. महाराष्ट्रात समज आणि गैरसमजातून झालेले काही प्रश्न आहेत. या विषयाला आम्ही आता फुल स्टॉप दिलेला आहे.”

- Advertisement -

“राज्यातील आगामी निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडीची एकजूट राहण्यासाठी सर्व नेत्यांनी संयम ठेवावा. आम्ही महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतो”, अशी भूमिका वडेट्टीवार म्हणाले. यावेळी वडेट्टीवारांनी पटोलेंना टोला लगावला.

नेत्यांनी महाराष्ट्राकडे लक्ष द्यावे

- Advertisement -

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. कर्नाटकसंदर्भात बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “महाराष्ट्रातील सत्ताधारी हे कर्नाटकात जाऊन ढोल वाजवत होते. त्यांचे जर ढोल वाजवून झाले असेल तर निवडणुका संपल्या असतील. या नेत्यांनी आता महाराष्ट्राकडे लक्ष द्यावे”, असा टोलाही त्यांनी लगावला.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी

राज्यात अवकाळी पावसावर राज्य सरकारवर निशाणा साधला वडेट्टीवार म्हणाले, “राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहेत. जर तुमच्या पोटाची चिंता मिटली असेल तर आता शेतकऱ्यांच्या पोटाची चिंता करा आणि राज्यातील शेतकऱ्यांना त्वरित मदत करा. नुकसानग्रस्त शेतकरी सरकारच्या मदतीची आस लावू बसला आहे. कर्नाटकात जे व्हायचे आहे ते होऊ देत, आता शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे.”

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -