घरमहाराष्ट्रकोणाच्या E-mail वर होणार शिक्कामोर्तब; नरहरी झिरवाळ की १६ आमदार?

कोणाच्या E-mail वर होणार शिक्कामोर्तब; नरहरी झिरवाळ की १६ आमदार?

Subscribe

 

मुंबईः महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी E-mail द्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार यांना अपात्रतेची दिलेली नोटीस व याच १६ आमदारांनी E-mail द्वारेच नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात आणलेला अविश्वास ठराव, यांपैकी कोणाच्या E-mail वर सर्वोच्च न्यायालय शिक्कामोर्तब करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

- Advertisement -

शिवसेनेत बंड करुन एकनाथ शिंदे हे गुजरातला रवाना झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत १५ आमदार होते. विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांनी या १६ आमदारांनी बैठकीचा व्हिप जारी केला. तसा मेल त्यांना पाठवण्यात आला होता. ते बैठकीला हजर झाले नाहीत. आम्ही बाहेर असल्याने बैठकीला हजर राहू शकत नाही, असा मेल १६ आमदारांनी केला. त्यामुळे झिरवाळ यांनी या १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस E-mail द्वारे जारी केली. त्याचवेळी या १६ आमदारांनी झिरवाळ यांच्याविरोधातील अविश्वास ठराव E-mail द्वारे पाठवला होता.

झिरवाळ व १६ आमदारांनी एकमेकांना पाठवलेल्या E-mail वर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शाह, न्या. कृष्णा मुरारी, न्या. हिमा कोहली, न्या. पी. आर. नरसिम्हा यांच्या घटनापीठासमोर सुनावणी झाली. मार्च महिन्यात सुनावणी पूर्ण झाल्यावर न्यायालयाने यावरील निकाल राखून ठेवला. उद्या सकाळी साडेदहा वाजता घटनापीठ यावर निकाल देणार आहे.

- Advertisement -

याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात एकूण सहा याचिका दाखल झाल्या होत्या. पहिली याचिका ठाकरे गटाचे आमदार सुभाष देसाई यांची आहे. या याचिकेत तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रधान सचिव यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. दुसरी याचिका मुख्यमंत्री एकनाथ संभाजीराव शिंदे यांची आहे. या याचिकेत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. तिसरी याचिका शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केली आहे. या याचिकेतही विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. चौथी याचिका ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी केली आहे. या याचिकेत तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रधान सचिव यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. पाचवी याचिका ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांचीच आहे. या याचिकेत विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व अन्य यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. सहावी याचिकाही ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांचीच आहे. या याचिकेत विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -