घरपालघरशहराची दुरवस्था करणार्‍यांवर कारवाईचा बडगा कधी?

शहराची दुरवस्था करणार्‍यांवर कारवाईचा बडगा कधी?

Subscribe

सध्या येथे प्रशासक राजवट सुरू आहे. नगरपंचायत प्रशासनाकडे केलेल्या कुठल्याच तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप येथील नागरिकांकडून केला जात आहे.

वाडा:  येथील नगरपंचायत कार्यक्षेत्रात येणार्‍या मुख्य रस्त्यांलगत अनधिकृत टपर्‍या, हातगाड्या यांचे प्रमाण रोज वाढत आहे. काही व्यावसायिक रस्त्यावर दुकानातील केरकचरा टाकत आहेत. याबाबत येथील नगरपंचायत प्रशासन कुठलीही कारवाई करीत नसल्याने येथील नागरिक समाज माध्यमांतून संताप व्यक्त करीत आहेत.
वाडा नगरपंचायतीमध्ये लोकप्रतिनिधींची (नगरसेवक) मुदत 3 जानेवारी 2023 पासुन संपुष्टात आली आहे. ओबीसी आरक्षणाचा वाद न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने नगरपंचायतीचा नव्याने होणार्‍या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. सध्या येथे प्रशासक राजवट सुरू आहे. नगरपंचायत प्रशासनाकडे केलेल्या कुठल्याच तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप येथील नागरिकांकडून केला जात आहे.

 

- Advertisement -

जबाबदारी ढकलण्याचेच काम
नगरपंचायत प्रशासनाकडे येथील वाहतूक कोंडीबाबत विचारणा केली असता ते पोलीस प्रशासनाचे काम आहे,असे सांगितले जाते. रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत विचारले असता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखविले जाते. तर नगरपंचायत क्षेत्रातील विद्युत खांबावरील विजेचे दिवे दिवसभर सुरु असतात, याबाबत छेडले असता हे काम सुद्धा नगरपंचायतीचे नसल्याचे सांगितले जात आहे.

कोट
रस्त्यावर घनकचरा टाकणार्‍या व्यक्तींचे फोटोसह तक्रारी करुनही नगरपंचायतीकडून कुठलीच कारवाई केली जात नाही.
-रोहन पाटील – माजी सरपंच, वाडा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -