घरदेश-विदेशमेट्रो ट्रेनमध्ये महिलांच्या वेषात पुरुष करतात पाकिटमारी

मेट्रो ट्रेनमध्ये महिलांच्या वेषात पुरुष करतात पाकिटमारी

Subscribe

दिल्ली मेट्रोमध्ये महिला पाकिटमारांची संख्या अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. या मेट्रोमध्ये पुरुष देखील महिलांच्या वेषात पाकिटमार करत असल्याचे समोर आले आहे.

पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून महिलाही पुरुषांप्रमाणे काम करत आहेत. आज पुरुषांप्रमाणे महिला घर, नोकरी, संसार सांभाळून नोकरी, व्यवसाय करत वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर असल्याचे आपण पाहिले आहे. मात्र आता गुन्हे करण्यात देखील महिलांची आघाडी असल्याचे समोर आले आहे. २०१८ मध्ये दिल्ली मेट्रोत झालेल्या ४९७ पाकिटमारांच्या गुन्ह्यांपैकी तब्बल ९४ टक्के गुन्हे हे महिला पाकिटमारांनी केल्याची माहिती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा फोर्स (CISF) च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे दिल्लीतील मेट्रोमध्ये पाकिटमार करणारे पुरुष देखील महिलांच्याच वेषात मेट्रोमध्ये चढतात आणि इतर पुरुषांचे पाकिट मारतात. असा खुलासा सीआयएसएफने केला आहे. एखाद्या महिलेला लाजवेल इतकं नटूनथटून सलवार कमीज परिधान करुन हे पुरुष मेट्रोमध्ये प्रवेश करत असल्याचे समोर आले आहे.

२०१७ मध्ये ८५ टक्के पाकिटमाऱ्या महिला

दिल्लीतील मेट्रोची सुरक्षा सीआयएसएफचे जवान सांभाळतात. मात्र सुरक्षा असताना देखील मेट्रोमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हे घडत असल्याची माहिती समोर आली आहे. २०१७ मध्ये दिल्लीतील मेट्रोत १३९२ पाकिटमाऱ्या झाल्या होत्या. यातील ८५ टक्के पाकिटमारीचे गुन्हे महिलांनी केले असल्याचे सीआयएसएफच्या माहितीनुसार समोर आले आहे.

- Advertisement -

पुरुषांशी गैरवर्तणूक करुन मारतात पाकिट

सीआयएसएफच्या माहितीनुसार या महिला मध्य दिल्लीत मेट्रोमध्ये चढतात. पुरुषांशी गैरवर्तवणूक करतात. मात्र ते ही शक्य झाले नाही तर या महिला फुरषांच्या नको तितके जवळ येण्याचा प्रयत्न करतात आणि पाकिट मारतात. मात्र अशा महिला जर मेट्रोमध्ये जवळ आल्यास सावधान रहा. कारण या महिला पाकिटमार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दिल्ली मेट्रोमधून प्रवास करताना सावधानता बाळगावी असे आवाहन सीआयएसएफने केले आहे.

पुरुष पाकिटमारही महिलांच्या वेषात

 

- Advertisement -

वाचा – दिल्लीत माकडांनाही गारेगार मेट्रोची हौस

वाचा – दिल्लीमध्ये मेट्रो स्टेशनवर अंगावर अॅसिड पडून ६ जण जखमी एकाचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -