घरमहाराष्ट्रपुणेकिशोर आवारे हत्या प्रकरण: माजी नगरसेवकाच्या मुलाचा हात; बापाला मारल्याचा घेतला बदला

किशोर आवारे हत्या प्रकरण: माजी नगरसेवकाच्या मुलाचा हात; बापाला मारल्याचा घेतला बदला

Subscribe

पुणे : पुण्याच्या तळेगावमधील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे (Kishor aware) यांच्या हत्या प्रकरणात माजी नगरसेवक भानू खळदे (bhanu khalde) यांचा मुलगा गौरव खळदे याचा हात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. जुन्या वादातून गौरव खळदे (Gaurav Khalde) यांने बदला घेण्याच्या हेतूने ही हत्या घडवून आणली आहे.

काही महिन्यांपूर्वी किशोर आवारे आणि भानू खळदे यांच्यामध्ये वाद झाला होता. यावेळी आवारेंनी खळदे यांच्या कानशिलात लगावली होती. हाच राग मनात ठेवून खळदे यांचा मुलगा गौरव खळदे याने मारेकऱ्यांना किशोर आवारे यांच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यामुळे किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात शुक्रवारी (12 मे) दुपारी दोनच्या सुमारास कामानिमित्त आले असता त्यांच्यावर दबा धरून बसलेल्या चार जणांनी प्राणघातक हल्ला केला. यापैकी दोघांंनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, तर दोघांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले.

- Advertisement -

दरम्यान, हल्लेखोरांनी हल्ला केल्यानंतर आवरे रक्‍ताच्या थारोळ्यात पडले होते, यावेळी यावेळी हल्लेखोर काहीवेळ त्या ठिकाणी थांबले होते. हल्लेखोर निघून गेल्यावर जखमी आवारे यांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी उपचारांना प्रतिसाद देणं बंद केले आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाशी दांडगा जनसंपर्क
किशोर आवारे यांनी जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून तळेगावात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाशी दांडगा जनसंपर्क बनवला होता. त्यामुळे किशोर आवारे यांना मानणारा तळेगावात मोठा वर्ग होता. सहा वर्षांपूर्वी तळेगाव नगरपरिषद निवडणुकीत किशोर आवारे यांनी जनसेवा विकास समितीचे नगरसेवक निवडून आणून राजकारणात आपले स्थान बळकट केले होते. त्यामुळे राजकीय वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.

- Advertisement -

समाजभूषण पुरस्कार जाहीर
किशोर आवारे यांना सामाजिक कार्याची त्यांना  आधीपासून आवड असल्यामुळे त्यांनी स्वत:ला समाजकार्यात वाहून घेतले होते. त्यांनी कोरोना महामारी तसेच कोल्हापूर आणि चिपळूण पूर आदी आपत्कालीन परिस्थितीत किशोर आवारे यांनी स्वखर्चातून भरीव मदतकार्य केले होते. त्यामुळे पुण्यातील महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा यांच्या वतीने डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार किशोर आवारे यांना जाहीर झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -