घरक्रीडाMSD IPL Retirement : आयपीएलच्या 16 व्या हंगामानंतर धोनी निवृत्ती घेणार?

MSD IPL Retirement : आयपीएलच्या 16 व्या हंगामानंतर धोनी निवृत्ती घेणार?

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 16 व्या हंगामानंतर चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्तीची घोषणा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबात अद्याप अधिकृत वृत्त समोर आलेले नाही. मात्र, सोशल मीडियावर सध्या धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 16 व्या हंगामानंतर चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्तीची घोषणा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबात अद्याप अधिकृत वृत्त समोर आलेले नाही. मात्र, सोशल मीडियावर सध्या धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे. तसेच, धोनी निवृत्त घेत असल्याने चेन्नईच्या चाहत्यांमध्ये नाराजी वातावरण निर्माण झाले आहे. (Ipl 2023 csk vs kkr chennai super kings captain mahendra singh dhoni give special tribute for fans after last match)

आयपीएल 16 व्या हंगामातील कालचा सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात झाला. या सामन्यात कोलकाताने 6 विकेट्सने चेन्नईवर विजय मिळवला. कोलकाताने 145 धावांचे आव्हान 4 विकेट्स गमावून 18.3 ओव्हरमध्ये पूर्ण केले. कोलकाताने या विजयासह प्लेऑफच्या जर तरच्या आशा कायम ठेवल्या आहेत. तर चेन्नईच्या पराभवामुळे प्लेऑफची प्रतिक्षा आणखी वाढली आहे.

- Advertisement -

चेन्नईला आता दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध होणाऱ्या सामन्यात जिंकावे लागणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचा हा या 16 व्या हंगामातील घरच्या मैदानातील अखेरचा सामना होता. त्यामुळे कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आपल्या संघासोबत संपूर्ण मैदानात फेरी मारत चाहत्यांचे आभार मानले.

चेन्नईचे प्लेऑफमधील स्थान अजून निश्चित नाही. त्यामुळे अधिकृतरित्या चेन्नईचा केकेआर विरुद्धचा हा या हंगामातील घरच्या मैदानातील अखेरचा सामना ठरला. धोनीला पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी या हंगामात चेन्नईच्या प्रत्येक सामन्यात आवर्जून हजेरी लावली. त्यानुसारच एम ए चिदंबरम स्टेडियममध्येही चाहत्यांनी एकच गर्दी केली. धोनीला घरच्या मैदानात संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. मात्र धोनी चाहत्यांचे आभार मानायला विसरला नाही.

- Advertisement -

सामना संपल्यानंतर आधी कोलकाताच्या रिंकू सिंह आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनी धोनीला गाठले. या दोघांनी जर्सीवर धोनीकडून त्याची ऑटोग्राफ घेतली. त्यानंतर धोनी आणि संपूर्ण चेन्नईच्या संघाने मैदानात फेरी मारायला सुरुवात केली. मात्र यामध्ये धोनी पुढे होता. चाहत्यांना गिफ्ट म्हणून धोनीसह चेन्नईचे खेळाडू काहीतरी वस्तू फेकून देत होते. यावेळी भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि सुत्रसंचालक सुनील गावसकर यांनी धोनीकडून आपल्या शर्टावर ऑटोग्राफ घेतला. गावसकरांच्या या कृतीमुळे धोनीच्या निवृत्तीवर जवळपास शिक्कामोर्तब झाला.


हेही वाचा – IPL 2023 : आतापर्यंतच्या सामन्यांनंतर ऑरेन्ज, पर्पल कॅप कुणाकडे? वाचा सविस्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -