घरताज्या घडामोडीमुंबईतील खारदांडा कोळीवाड्यात भीषण आग; 6 जण जखमी

मुंबईतील खारदांडा कोळीवाड्यात भीषण आग; 6 जण जखमी

Subscribe

मुंबईतील खारदांडा कोळीवाड्यात भीषण आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सोमवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही आग लागली.

मुंबई : खार (प.) कोळीवाडा येथे सोमवारी सकाळी एका घरात गॅस सिलिंडरमधून गॅसची गळती होऊन लागलेल्या आगीमुळे सहाजण ४० ते ५० टक्के भाजून जखमी झाले. सर्व जखमींना तत्काळ नजीकच्या वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर आयसीयू कक्षात उपचार सुरू आहेत. तर, सहापैकी दोघांना पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिवबाबू हाऊस, मधला पाडा, गोविंद पाटील रोड, खासार गल्ली, रिझवी शाळेजवळ, खार (पश्चिम) येथे, सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास गॅस सिलिंडरमधून अचानक गळती होऊन आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. काही कळण्यापूर्वीच या आगीत सहा जण ४० टक्के ते ५१ टक्केपर्यंत भाजले. या आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घराकडे धाव घेतली. तसेच, अग्निशमन दलाच्या जवनांनीही घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी एका तासात अथक प्रयत्न करून सदर घरातील आग विझविली. त्यामुळे पुढील धोका टळला.

- Advertisement -

या दुर्घटनेत, सखुबाई जैस्वाल (वय ६५ – ४५ टक्के भाजल्या), प्रियांका जैस्वाल (वय २६ – ५१ टक्के भाजल्या), निकिता मंडलिक (वय २६ – ४५ टक्के भाजल्या), सुनील जैस्वाल (वय २९ – ५० टक्के भाजले) या चौघांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर वंशिका चव्हाण (वय ७ – ४० टक्के भाजली) आणि प्रथम जैस्वाल (वय ६ – ४५ टक्के) या दोघांना भाभा रुग्णालयामधून कस्तुरबा रुग्णालयात पुढील उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आले आहे. गॅसगळती होऊन आग कशी काय लागली, सहा जण जखमी कसे काय झाले याबाबत स्थानिक पोलीस, अग्निशमन दल हे अधिक माहिती घेत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक! एका रिक्षात 14 जण; बस अपघातात 7 महिलांचा जागीच मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -