घरताज्या घडामोडीपुण्याला जाण्यासाठी माळशेज घाटमार्गे जाताय? त्याआधी ही बातमी वाचा

पुण्याला जाण्यासाठी माळशेज घाटमार्गे जाताय? त्याआधी ही बातमी वाचा

Subscribe

मुंबईहून पुण्याला आणि अहमदनगर जाण्यासाठी बऱ्याचदा वाहनचालक माळशेज घाटाचा वापर करतात. माळशेज घाट जवळचा मार्ग असल्याने नागरिक याला सर्वाधिक पसंती देतात. शिवाय पावसाळ्यातही या घाटावर कोसळणाऱ्या धबधब्यांमुळे प्रवाशांची मोठी गर्दी जमते. मात्र, आता माळशेज घाटावरून जाण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

मुंबईहून पुण्याला आणि अहमदनगर जाण्यासाठी बऱ्याचदा वाहनचालक माळशेज घाटाचा वापर करतात. माळशेज घाट जवळचा मार्ग असल्याने नागरिक याला सर्वाधिक पसंती देतात. शिवाय पावसाळ्यातही या घाटावर कोसळणाऱ्या धबधब्यांमुळे प्रवाशांची मोठी गर्दी जमते. मात्र, आता माळशेज घाटावरून जाण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण गुरुवार दिनांक १९ मे ते प्रत्येक गुरुवारी सकाळी ६ ते सायंकाळी ६ हा मार्ग रस्त्याच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. (pune the road in malshej ghat will be closed for concreting of the national highway)

दगड फोडण्यासाठी विस्फोटकांचा वापर करण्यात येणार असल्याने वाहतुकीत बदल देखील करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ मधील किमी ८४.००० ते १०१.००० पर्यंत दुहेरी कॉक्रिटीकरण करण्याचे काम सद्या जोरात सुरू आहे. पुणे जिल्यातील लांबी किमी १८.६०० ते १००.२८० रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी हा मार्ग बंद करण्यात येणार आहे. यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

- Advertisement -

माळशेज घाट बंद असल्याने पर्यायी व्यवस्थाही करण्यात आली आहे. पर्यायी वाहतुक व्यवस्था ही कल्याण- माळशेज घाट खुबी करंजाळे खिरेश्वर ते कोल्हेवाडी- सागनोरी ते पिंपळगाव जोगा ते भोईरवाडी ते कोळवाडी. ओतूर- आळेफाटा- अहमदनगर अशी असणार आहे. तसेच पर्यायी मार्गावर अवजड वाहनांवर बंदी असणार आहे. पुढील सूचना येईपर्यंत अशीच व्यवस्था असणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, माळशेज घाट हा मुंबईच्या नागरिकांना किंवा पुणे, अहमदनगर मधून जाणाऱ्या नागरिकांसाठी जवळचा मार्ग आहे. त्यामुळे माळशेज घाटातून अनेक प्रवाशी ये-जा करतात. माळशेज घाट हा नगर, नाशिक, पुणे कडील नागरिकांना जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे.

- Advertisement -

शिवाय, पावसाळ्यापूर्वी या मार्गावर रस्त्याची कामे सुरू करण्यात आली असून पावसाळा सुरू झाल्यानंतर कामे पूर्ण करण्याचे. प्रयत्न प्रशासनाचे आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी म्हणून हा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी मुंबईकडे जाताना पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.


हेही वाचा – छत्रपती संभाजीनगर नाही, औरंगाबाद म्हणा…; माध्यमांविरोधात मुख्य सचिवांकडे तक्रार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -