घरताज्या घडामोडीरत्नागिरीत हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंब्‍याची विक्री, बागायतदार आक्रमक

रत्नागिरीत हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंब्‍याची विक्री, बागायतदार आक्रमक

Subscribe

रत्नागिरीत हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंब्याची विक्री सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. व्यापारांकडून सर्वसामान्य ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकीचा प्रकार काल(बुधवार) सकाळी रत्नागिरीतील आंबा बागायतदारांनी उघडकीस आणला. हापूस आंब्याचे पीक यावर्षी अवघे दहाच टक्के आले आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन काही आंबा व्यापारी कर्नाटकातील आंबे आणून हापूसच्या नावाखाली विकत आहेत.

कोकणातील हापूस आंब्यासारखी गोडी या आंब्याला नसली तरी दिसण्यात हापूस सारखाच असल्याने त्याचा फायदा व्यापारी उचलत आहेत. काल सकाळी आंबा बागायतदारांनी थेट व्यापारांना गाठलं आणि आंब्याची तपासणी केली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. हापूस आंब्याच्या नावाखाली बागायतदारांनी कर्नाटकी आंबा विकू नये, अशी विनंती व्यापारांना केली. व्यापारांनी यात बदल न केल्यास बागायतदारांच्या रोशाला सामोरे जावे लागेल, असा इशारा आंबा बागायतदारांनी व्यापारांना दिला.

- Advertisement -

गेल्या अनेक वर्षांपासून आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. यंदा अवकाळी पावसामुळं हापूस आंब्याचं उत्पादन घटलं आहे. कोकणासह मुंबई आणि पुण्यातील बाजारपेठेत हापूसच्या नावाखाली कर्नाटकातील आंब्याची विक्री होत असल्याचा आरोप आंबा उत्पादक संघाकडून करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काही बागायतदार हापूसच्या नावाखाली कर्नाटकमधील आंब्याची विक्री करत आहे. त्यामुळं असे शेतकरी आणि बागायतदारांना भेटून त्यांना समज देण्यात येणार असल्याचं आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष बावा साळवी यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : देशातील लोकशाही न्यायव्यवस्था संकटात – खासदार संजय राऊत

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -